समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव

समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव

नाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊन थेट जमीन खरेदी करणाऱ्या प्रशासनाने आजवर ८० टक्के जमीन ताब्यात घेतली आहे. तरीही उर्वरित २० टक्के जागा ताब्यात मिळत नसल्याने त्यासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाला पाठविण्यात आला आहे.

शासनाने भूसंपादनाची अंतिम नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन थेट जमीन खरेदीचा मार्ग बंद होणार आहे.  सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतून शंभर किलोमीटर मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी जागामालक शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला जाहीर करण्यात येऊन ८५७ हेक्टर जमीन थेट खरेदीने घेण्यात आली आहे. मार्गावर १५७ हेक्टर जमीन शासकीय असल्याने त्याचा ताबा घेण्यात आला आहे. आता २० टक्के जमीन भाऊबंदकी तसेच न्यायालयीन वादात अडकली आहे.

सक्तीच्या भूसंपादनाशिवाय काहीच पर्याय नसल्याने शासनाने मे महिन्यात तालुक्यांसाठी प्रारूप अधिसूचना जारी केली होती. त्यावर जमीनमालकांच्या हरकतींसाठी २१ दिवस मुदत दिली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या हरकतींची सुनावणी पूर्ण केली अाहे.

आता हा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी दाखल होईल. पुढच्या आठवड्यात शासनाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, ती प्रसिद्ध झाल्यास पाचपट मोबदला देऊन थेट खरेदीचा मार्ग बंद होणार आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांडून जमिनीच्या मोबदल्याचे निवाडे जाहीर करून भूसंपादन केले जाणार आहे.

शिवड्याची मोजणी झाली शिवडे ग्रामस्थांनी या महामार्गासाठी सुरवातीपासून विरोध करून त्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने नागरिकांचाही विरोध मावळला असून, शिवड्याची संयुक्त जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. शिवाय त्यातील बहुतांशी जागामालकांनी संमतीपत्रेही दिल्यामुळे त्यांची जमीन थेट खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे.

सक्तीने संपादन होणारी गावे अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यास सिन्नर तालुक्यातील १३६.५९ हेक्टर जमिनीसाठी २५ गावांत सक्तीचे संपादन होणार आहे. त्यात आगासखिंड, बेलू, मर्हळ, वारेगाव, कोनांबे, खंबाळे, फुलेनगर, धोंडवीरनगर, जे. पी. नगर, पांढुर्ली, वावी, सावता माळीनगर, दुशिंगवाडी, माळढोण, मर्हळ बु., पाथरे, पाटोळे, डुबेरे, सायाळे, बोरखिंड, गोरवड या गावांचा समावेश अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com