agriculture news in marathi Forecast for the 2020 October to December Season Rainfall and Temperature over South Asia | Agrowon

दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ राहणार; ऑक्टोबर-डिसेंबरसाठीचा अंदाज जाहीर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तसेच तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहील, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तसेच तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहील, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या मॉन्सूनोत्तर पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियायी देशांच्या फोरमची १७ वी बैठक नुकतीच झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. भारतासह सर्व दक्षिण आशियायी देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्था या बैठकीत सहभागी झाल्या आहेत. या बैठकीत प्रशांत महासागर आणि भारतीय समुद्रातील हवामान स्थिती व माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला.

मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण आशियातील भारताची दक्षिणेकडील राज्ये, श्रीलंका, मालदीव या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदाच्या हंगामात अग्नेय भारत, श्रीलंका, मालदीव भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर हिमालय पर्वताच्या पायथ्यालगतच्या भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. तर मध्य, दक्षिण भारताचा काही भाग, उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरालगतच्या राज्यासह म्यानमारमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण आशियातील बहुतांशी भागात तापमान सरासरी इतके किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामान स्थिती, विविध मॉडेलच्या निरीक्षणांच्या साहाय्याने हे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहे. प्रशांत महासागरात सध्या सौम्य ला-निना स्थिती आहे. तर इंडियन ओशन डायपोल सर्वसामान्य स्थितीत आहे. मॉन्सूनोत्तर काळात ही स्थिती कायम राहणार असल्याचेही सॅस्कॉफच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...