विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाचा अंदाज

विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाचा अंदाज
विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाचा अंदाज

पुणे  ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा व जम्मू- काश्मीरच्या भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याचा काहीसा परिणाम विदर्भातील वातावरणात होणार आहे. येत्या बुधवारी (ता. १३) विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.   राजस्थानच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंडीगड या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडेल. त्याचा विदर्भातील काही भागावर काहीसा परिणाम होणार असून वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.   बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली. हे क्षेत्र पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले. त्यामुळे उडीसा, आसाम, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.  कमी दाबाचे क्षेत्र (शनिवारी) गोपाळपूरपासून पूर्वेकडे १७० किलोमीटर अंतरावर होते. दिघापासून आग्नेयकडे ३२०, परादीपपासून १२० किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे उडिसा, पश्चिम बंगालच्या भागात गेले दोन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. शनिवारी (ता. ९) वाऱ्याचा वेग ताशी ४५ त ५५ किलोमीटर एवढा होता. आज (रविवारी) त्याचा वेग ३५ ते ४५ किलोमीटर एवढा राहिला. त्यानंतर त्याचा वेग कमी होत जाऊन ते विरून जाईल.  सध्या कोकण किनारपट्टीवरून वारे वाहत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचाही महाराष्ट्रातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा ते सात अंशापर्यंत वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली. शनिवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १३.६ अंश सेल्सिअसएवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   शनिवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई (सांताक्रूझ) २१.९ (३), अलिबाग २२.० (३), रत्नागिरी २१.५ (१), डहाणू २२.५ (४), भिरा २०.० (२), नगर १५.२ (३), पुणे १८.२ (७), जळगाव १८.० (६), कोल्हापूर १८.४ (३),  महाबळेश्वर १५.६ (३), मालेगाव १८.३ (७), नाशिक १५.२ (४), सांगली १७.२ (३), सातारा १६.३ (३), सोलापूर १५.४, औरंगाबाद १६.८ (५), बीड २०.२(८), उस्मानाबाद १४.०, परभणी १८.४ (४), नांदेड १६.० (३) अकोला १६.७ (३), अमरावती १९.२(४), बुलढाणा १६.६ (३), चंद्रपूर १७.२ (४), गोंदिया १३.६ (१), नागपूर १५.१ (२),  वर्धा १७.५ (३), यवतमाळ १६.० (१).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com