agriculture news in Marathi forest area reduced in Gadchiroli Maharashtra | Agrowon

गडचिरोलीत घटले जंगल क्षेत्र

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

गेल्या आठ वर्षात राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणाऱ्या गडचिरोलीत तब्बल १७७.०६ चौरस किलोमीटर जंगल घटल्याचा धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

गडचिरोली ः जल, जंगल आणि जमीन संरक्षणासाठी शासनाकडून भर दिला जात आहे. असे असताना गेल्या आठ वर्षात राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणाऱ्या गडचिरोलीत तब्बल १७७.०६ चौरस किलोमीटर जंगल घटल्याचा धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या वतीने दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. २०१९ या वर्षातील अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कमी होणाऱ्या जंगल क्षेत्राचे वास्तव मांडण्यात आले आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्टच्या अहवालानुसार २०१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार चार चौरस किलोमीटरचे जंगल होते. २०१९ मध्ये ९ हजार ९१६ चौरसमीटर जंगल शिल्लक राहिले आहे. त्यावरुन जंगलक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे स्पष्ट होते. 

जंगल तोड अशीच होत राहिल्यास गडचिरोलीचा जंगलासाठीचा लौकिक कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ८० ते १०० वर्ष वय झालेली जवळपास पचा हजार हेक्‍टरवरील झाडे दरवर्षी तोडली जातात. त्या ठिकाणी नव्या रोपांची लागवड केली जाते.

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेत २०१६ ते २०१९ या चार वर्षाच्या कालावधीत १५ हजार हेक्‍टरवर वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. ही झाडे लहान असल्याने ती सॅटेलाईच्या नजरेत येत नाहीत, असा दावाही करण्यात आला आहे. 

गडचिरोलीत धोक्याची घंटा
गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. २०११ च्या अहवालात १० हजार ९४ चौरस किलोमीटरचे जंगलक्षेत्र दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्‍केवारीत हे प्रमाण ७०.०४ इतके होते. २०१९ मध्ये जंगल क्षेत्र ९,९१६ चौरस किलोमीटर राहिले असून ही टक्‍केवारी ६८.८१ इतकी आहे. ही या भविष्यासाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...