वन विभाग गैरव्यवहाराची चौकशी होणार ः भरणे

नगर ः पारनेर तालुक्यात वन विभागाने केलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. यातील दोषी उपवनसंरक्षक रमेश देवखिळे व प्रताप जगताप यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे. त्यांचा सध्याचा व सेवानिवृत्तीनंतरचा पगार थांबवावा, अशी सूचना आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत मांडली.
 Forest Department Abuse Inquiry will be: Bharne
Forest Department Abuse Inquiry will be: Bharne

नगर ः पारनेर तालुक्यात वन विभागाने केलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. यातील दोषी उपवनसंरक्षक रमेश देवखिळे व प्रताप जगताप यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे. त्यांचा सध्याचा व सेवानिवृत्तीनंतरचा पगार थांबवावा, अशी सूचना आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत मांडली. त्यावर आठ दिवसांत चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन वन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिले.

पारनेर तालुक्यात वन विभागाने केलेल्या जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार लंके यांनी केली होती. त्यानंतर ज्या कामाची तक्रार केली, त्या कामावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पुरावे दिले. गुरुवारी (ता.२४) या गैरव्यवहारप्रकरणी लंके विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. 

लंके म्हणाले, ‘‘सहा महिन्यांपासून मी या बाबत तक्रार करूनही संबंधित विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. दोनही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.’’

विधानसभेत काही काळ गोंधळही झाला. येत्या आठ दिवसांत नाशिक प्रादेशिक वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून तातडीने कारवाईचे आश्वासन भरणे यांनी दिले. वन विभागाने जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेंतर्गत तालुक्यात वाळवणे, रुई, पळवे या ठिकाणी मृद व जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यात लाखोंचा गैरव्यवहार झाला आहे. या बाबतची तक्रार लंके यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

सूचनेवर वनमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. असे झाले नाही, तर वनमंत्र्यांच्या दालनात धरणे आंदोलन करू.

- नीलेश लंके, आमदार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com