नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते, वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी (ता. २८) राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपविला.
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते, वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी (ता. २८) राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपविला. मागील दोन आठवड्यांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री राठोड चर्चेत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
वरिष्ठ मंत्र्यांच्या चर्चेनंतर राजीनामा
वनमंत्री संजय राठोड रविवारी दुपारी आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले. या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली. या वेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. या चौघांमध्ये चर्चा झाली, चर्चेनंतर राजीनामा घेण्यात आला. राजीनाम्यानंतर बोलताना राठोड म्हणाले, ``विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण करून माझी, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे.``