वन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार ः राज्यमंत्री भरणे

Forest will remove encroachments on land: Minister of State Bharane
Forest will remove encroachments on land: Minister of State Bharane

पुणे ः वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्यासाठी ठोस अजेंडा लवकरच राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक व वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

सार्वजनिक व वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शुक्रवारी (ता. ११) पुण्यातील तळजाई पठाराला भेट देत वन जमिनीची पाहणी केली. त्या वेळी श्री. भरणे यांनी ही माहिती दिली. 

या वेळी मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपविभागीय अधिकारी श्रीलक्ष्मी ए. वनपरिक्षेत्र अधिकारी डी. ए. पवार, वनपरिमंडल अधिकारी जी. एम. सरोदे, नियत क्षेत्र अधिकारी आर. एस. घाडगे, नगरसेवक सुभाष जगताप, विकास दांगट, श्रीराज भरमे, मंदार नागरगोजे आदी उपस्थित होते.

श्री भरणे म्हणाले की, ‘‘अतिक्रमणाविरोधात वन विभागाकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. वनांमुळे आपण शुद्ध हवा घेऊ शकतो. त्याची जपवणूक करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासकीय जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलेले आढळल्यास त्यातर तातडीने कारवाई करण्यात येईल. याकरिता तरुण पिढीनेदेखील पुढाकार घेण्याची गरज आहे. आपल्याला वनाचे क्षेत्र उपलब्ध झालेले आहे. हा ठेवा आपण जपूयात. त्याकरिता शासन लागेल ती मदत करेल. याकरिता अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. वन विभागाच्या हद्दीतील जागांवर अतिक्रमण झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वनजमिनी मोकळ्या करण्यात येतील. वन विभागाच्या कोणत्याही जमिनीवर म्हणजे राखीव संरक्षित वा झुडपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com