Agriculture News in Marathi Forgive the entire electricity bill of the farmers | Page 2 ||| Agrowon

नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

 अडचणीच्या काळात ‘महावितरण’कडून वीजबिल न भरल्याने शेतकऱ्यांचा रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करत शेतकऱ्यांची गळचेपी सुरू आहे.

नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा अडचणीच्या काळात ‘महावितरण’कडून वीजबिल न भरल्याने शेतकऱ्यांचा रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करत शेतकऱ्यांची गळचेपी सुरू आहे. यावर उपाय म्हणून शासनाने पंजाबच्या धर्तीवर सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये करण्यात आला. 

अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या वेळी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, सुरेखा दराडे, आश्‍विनी आहेर, सुशिला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे उपस्थित होते. 

सभेच्या सुरुवातीला सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी महावितरणाकडून वीजबिलापोटी रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे सांगत सध्या शेतीमालाल भाव नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनेक नुकसान झाले आहे. यातच लागवड केलेल्या पिकातून आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असतानाच महावितरणाकडून त्याचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचे पंजाब सरकारच्या धर्तीवर संपूर्ण वीजबिल व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी सभागृहात ठराव केला. 

सदस्य महेंद्र काले यांनी देखील जिल्ह्यातील येवला तालुका पूर्वभाग आणि नांदगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत बांधण्यात आलेले सर्व बंधारे वाहून गेले आहेत. रस्ते संपूर्ण खराब झाले आहे. त्यामुळे ते तातडीने दुरुस्त व्हावे, यासाठी शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करा, अशी मागणी अध्यक्षांकडे केली. यावर क्षीरसागर यांनी कोरोनाकाळात निधीत ३० टक्के कपात केली आहे. तो निधी परत मिळावा म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन सभागृहास दिले. या वेळी सदस्य डी. के. जगताप, सविता पवार, छाया गोतरणे व विभागप्रमुख उपस्थित होते. 

दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करा 
स्थायी समिती सभेत निविदा काढण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरत एखाद्या कामास आठ महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्यावरील पुढील कार्यवाहीसाठी का विलंब होतो, असा सवाल डॉ. कुंभार्डे यांनी उपस्थित करत प्रशासनाच्या कामाजावर नाराजी व्यक्त केली.

सदस्यांकडे आता अवघा तीन महिने कालावधी उरला असता कामे कधी पूर्ण करणार? असा सवाल केला. याची अध्यक्ष क्षीरसागर यांनी नोंद घेत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ते कामाची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पुढील दोन महिन्यांतच पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
 


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...