agriculture news in marathi, form deadline of loanwaiver scheme extended it 20th may | Agrowon

शेतकरी कर्जमाफी : अर्ज करण्यासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

एक जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह हमीभाव मिळावा या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्याआधी सरकारने थकबाकीदार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा केली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते. 

सुरवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी घोषणा सरकारने केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. ७६ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. छाननीत ६९ लाख अर्ज शिल्लक राहिले. प्रत्यक्षात, योजनेअंतर्गत ५५ लाखांपेक्षा अधिक खातेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यापैकी साडेसेहेचाळीस लाख खातेधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकी आतापर्यंत चौदा हजार सातशे एकोणनव्वद कोटी रुपये इतकी रक्कम, सदतीस लाख वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

तसेच अलीकडेच २००१ पासून कर्ज थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, पण २००८ व २००९ मधील कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित राहिले होते, अशा जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

अशी झाली मुदतवाढ
राज्य शासनाने जे शेतकरी काही कारणास्तव योजनेअंतर्गत अर्ज करू शकलेले नाहीत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा ३१ मार्च २०१८ पर्यंतची पुन्हा एक संधी दिली होती. त्यानंतर ही मुदत १४ एप्रिलपर्यंत पुन्हा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर आता पुन्हा २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...