नाशिक बाजार समितीच्या माजी सभापतींकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक शिवाजी चुंभळे यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना दमबाजी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी बाजार समितीच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून याबाबतचे पत्र पोलिस आयुक्त यांनाही सादर केले आहे.
Former Chairman of Nashik Bazar Samiti bullying om the employees
Former Chairman of Nashik Bazar Samiti bullying om the employees

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक शिवाजी चुंभळे यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना दमबाजी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी बाजार समितीच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून याबाबतचे पत्र पोलिस आयुक्त यांनाही सादर केले आहे. 

बाजार समितीच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारींत म्हटले आहे की, चुंभळे यांचे सभापती पद गेल्याने बाजार समितीच्या कामकाजाविषयी त्यांचा गैरसमज निर्माण झाला आहे. बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांना फोन करून दमदाटी व मारहाणीची धमकी ते देतात. तसेच जिल्हा उपनिबंधक व एसईबी यांच्याकडून चौकशी लावतो. तुम्हाला बघून घेतो, तुमचे निलंबन करतो, अशा धमक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.     चुंभळे यांच्याकडून मानसिक त्रास, धमक्या यामुळे भीतीचे वातावरण असून गुंडामार्फत मारहाणीची धमकी दिल्याने बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका आहे. आमचे बरेवाईट झाल्यास शिवाजी चुंभळे हे जबाबदार असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी बाजार समितीकडे केली होती. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळे येत असून विपरित परिणाम होत आहेत. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणणे, निलंबन करण्याची धमकी देणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत पोलिस पुढील चौकशी करत आहेत. 

चुंभळे यांच्या एकधिकारशाहीला कंटाळून संचालकांनी अविश्‍वास ठराव संमत केला. त्यातच बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्या प्रकरणी १३ कर्मचाऱ्यांनी चुंभळे हे दहशतीचे वातावरण तयार करतात व त्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याचे पत्र स्वाक्षरीसह दिले होते. त्यानंतर बाजार समितीकडून पोलिसांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

माजी सभापती चुंभळे हे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दमबाजी करतात. या बाबत तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. पोलिस यंत्रणेवर विश्‍वास असून, बाजार समिती भयमुक्त करण्यास मदत करतील, अशी आशा आहे. - संपतराव सकाळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com