Agriculture news in Marathi Former Chief Minister Fadnavis granted bail | Page 3 ||| Agrowon

फडणवीस यांना जामीन मंजूर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नागपूर : सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज अॅड. सतीश उके यांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यावर गुरुवारी (ता. २०) सुनावणी करताना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर फडणवीस यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

नागपूर : सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज अॅड. सतीश उके यांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यावर गुरुवारी (ता. २०) सुनावणी करताना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर फडणवीस यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

फडणवीस यांना न्यायालयाने आज न्यायालयात उपस्थित राहण्याची शेवटची संधी दिली होती. त्यानुसार ते हजर झाले. या वेळी फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘जनतेसाठी केलेल्या आंदोलनांमुळे आपल्यावर काही गुन्हे दाखल झाले होते. लोकांसाठी संघर्ष करताना दाखल झालेली सर्व प्रकरणे आहेत. २०१४ च्या आणि यावेळच्या निवडणुकीतही ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मी घेतली आहेत आणि या निवडणुकांमध्ये प्रक्रियेवर परिणाम करतील, असे कुठलेही गुन्हे मी लपविलेले नाहीत. ज्या गुन्ह्यांसाठी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले, ती १९९३ ते १९९८ दरम्यानची आहेत. आंदोलना दरम्यानचीच आहेत. दोन खासगी प्रकरणे दाखल करण्यात आली होती आणि ती निकालीही निघाली होती. या दाखल प्रकरणी सर्व माहिती न्यायालयाला देऊ,’’ 

न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे, असे सांगताना यामागे कोण आहे, याचीही आपल्याला कल्पना असल्याचे ते म्हणाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर जास्त बोलणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
 


इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...
सांगलीत शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणारसांगली : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मिळणार ५...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण...
औरंगाबाद येथे शेतकरी आठवडे बाजार सुरुऔरंगाबाद  ः'कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद...
औरंगाबाद येथे शेतकरी आठवडे बाजार सुरुऔरंगाबाद  ः'कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद...
कोल्हापुरात आजपासून बाजारसमितीतच...कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव तपोवन मैदानावर...
ऊसतोड कामगारांना आवश्यक सेवा द्याव्यात...सांगली  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
सिंधुदुर्गात शेतातच सडताहेत कलिंगडेसिंधुदुर्ग  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर...
‘अवकाळी’मुळे झालेल्या पीक नुकसानीचे...नगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान...