agriculture news in marathi Former Chief Minister Shivajirao Patil NIlangekar Passes away | Agrowon

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आज (बुधवारी) पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले.  त्यांच्यावर आज निलंग्यात अंत्यसंस्कार होणार आहे. 
 

लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. नुकतीच त्यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र आज (बुधवारी) पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले.  त्यांच्यावर आज निलंग्यात अंत्यसंस्कार होणार आहे. 

निलंगेकर हे 1985 ते 86 या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत.

शिवाजीराव निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी यावर यशस्वीपणे मातही केली. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला असला तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही. एक संघर्षशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने कोरोना विरूद्धची लढाई ते नक्कीच जिंकतील असा विश्वास निलंगेकर कुटूंबियांनी व्यक्त केला होता.  त्यांचे वय ९१ वर्षे असल्याने व पूर्वीचे आजार लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांना डाॅ. निलंगेकर वृृत्तपत्रे, पुस्तके नियमित वाचत होते. 

मधुमेह, रक्तदाब, किडनीचा त्रास असतानाच कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते. वैद्यकीय नियम व निकषानुसार इतरांना त्यांच्या संपर्कात येऊ दिले जात नव्हते. दरम्यान, उपचाराच्या वेळी निलंगेकर कुटूंबिय व त्यांचे निकटवर्ती माधवराव माळी वेळोवेळी डाॅक्टारांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत होते.

लातूरहून पुण्याला हलवल्यानंतर ते कोरोना विरुध्दची लढाई निश्चितच जिंकतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता.  मानसिकदृृष्ट्या ते खंबीर असल्याने कुटुंबियाचा हा विश्वास काही काळ खराही ठरला. त्यांचा १६ जुलै रोजी लातूर येथील खाजगी रुग्णालयात कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. त्यानंतर  कुटूंबियानी पुढील उपचारासाठी निलंगेकर यांना पुण्याला हलवले होते. त्यांचे चिरंजिव प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, डाॅ. शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर हे देखील दरम्यानच्या काळात क्वारंटाईन होते.

उपचार सुरू असतांनाही ते निलंग्यातील कोरोना विषयी परिस्थितीची विचारपूस सातत्याने करायचे. अगदी लातूरहुन निघण्यापूर्वीसुध्दा ते मोबाईलवरून अधिकार्‍यांशी बोलले होते. मात्र, किडनीच्या विकाराने बुधवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...