तूरविक्री प्रकरणी माजी नगराध्यक्षासह एक व्यक्ती गजाआड

आर्थिक गुन्हे शाखेकडे तूरविक्री प्रकरणाच्या तपास आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दोघांना अटक करण्यात आली होती. आज दोघांना अटक करण्यात आली आहे. एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पुन्हा काही जणांचा समावेश आहे. ते व्यक्तीही आमच्या रडारवर आहेत. -राहुलकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ
 former city president arrested in connection with tour Sale
former city president arrested in connection with tour Sale

यवतमाळ : शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूरखरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडला जास्त भावात विक्री केली. या फसवणूक प्रकरणी दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकासह एका व्यक्तीला गजाआड करण्यात आले, ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरिभाऊ काशिनाथ गुल्हाने (वय ५८, रा. तेलीपुरा, दारव्हा), अमीन बाहोद्दीन मलनस (वय ५०, रा. वडगाव गाढवे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तुरीची खरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघ, दारव्हा येथे नाफेडला जास्त भावात विक्री केली. त्यात शासनाची एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केली.

सहायक निबंधकअंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा प्रभारी मार्केटिंग अधिकारी यांनी १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दारव्हा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

या प्रकरणाचा तपास १६ जानेवारीला आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर २२ जानेवारीला धर्मेश देवराव ढोले (रा. नातुवाडी, दारव्हा), महेश ऊर्फ महेश्‍वर पंजाबराव भोयर (रा. शेलोडी) यांना अटक करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष गुल्हाने व बमीन मलसन या दोघांनी २०१८ मध्ये अपर सत्र न्यायालय दारव्हा येथे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज नामंजूर केला होता. तेव्हापासून अटकेची कारवाई होणे बाकी होते.

अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांनी केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com