पूर्वीची पीकपद्धती कुटुंब व्यवस्थेला पोषक ः डॉ. दिलीप मानकर

पूर्वीची पीकपद्धती कुटुंब व्यवस्थेला पोषक  ः डॉ. दिलीप मानकर
पूर्वीची पीकपद्धती कुटुंब व्यवस्थेला पोषक ः डॉ. दिलीप मानकर

गिरड, वर्धा  ः एकल पीक पद्धतीमुळे पारंपरिक पीक पद्धतीचा ऱ्हास झाला आहे. शेतकऱ्यांना भरवशाची उत्पन्न देणारी पीकपद्धती लोप पावली. पूर्वीच्या पीक पद्धतीने कुटुंब व्यवस्था चालायची. घरी लागणारे धान्य आणि जवसातून तेलाची पूर्तता व्हायची. त्यामुळे अशाच पीक पद्धतीचा अंगीकार करीत शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णतेकडे वळावे, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी दिला.  गिरड येथील मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात आयोजित जवस दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय जवस व मोहरी संशोधन प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून जवस प्रात्यक्षिक लाभार्थ्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानाचाही यात समावेश होता. अध्यक्षस्थानी डॉ. मानकर तर पाहूणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, तालुका कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी, जवस पैदासकार डॉ. बिना नायर, मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यशस्वी प्रात्यक्षिक राबविल्याबद्दल सावंगी येथील शेतकरी पांडुरंग मोहिते आणि पिंपळगावचे शेतकरी किसन हिवरे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. बिना नायर यांनी जवसाच्या औषधी व औद्योगिक गुणधर्माबद्दल माहिती दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com