माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

नवी दिल्ली : देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (वय 88) यांचे आज (मंगळवार) सकाळी दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. कामगारनेते, अनेक चळवळी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. जनता दल युनायटेड (जदयू) पक्षाकडून ते बिहारमधील मुझफ्फरनगरमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 1998 ते 2004 या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. त्यांनी याबरोबरच दुरसंचारमंत्री, उद्योगमंत्री आणि रेल्वेमंत्री या जबाबदाऱ्याही पार पाडल्या होत्या.

फर्नांडिस हे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राहिले होते. मुंबईतील कामगार चळवळीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. फर्नांडिस हे 1967 ते 2004 असे 9 वेळा लोकसभेत निवडून आले होते. जनतेचा नेता अशी ओळख असलेल्या फर्नांडिस यांच्या निधनानंतर कामगार नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com