भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे  बुधवारी (ता.१५) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 'वन डाऊन' फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते.

वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळविले. परदेशात कसोटी मालिका जिंकणारे वाडेकर हे पहिलेच भारतीय कर्णधार ठरले. याशिवाय, भारताच्या पहिल्या 'वनडे' संघाचेही ते सदस्य होते.

 त्यांना १९६७ मध्ये 'अर्जुन', तर १९७२ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर १९९० च्या दशकात वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. 

कसोटी संघाचे सदस्य, कर्णधार, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्षपद अशी सर्व ठिकाणी कामगिरी केलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये वाडेकर यांचा समावेश होतो. वाडेकर यांच्याशिवाय लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांनीच अशी कामगिरी केली आहे. महान क्रिकेटपटू हरपला: मुख्यमंत्री मुंबई : माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. श्री. वाडेकर यांनी खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती प्रमुख आणि क्रीडा संघटक अशा विविध भूमिकांतून भारतीय क्रिकेटला अतिशय मोलाचे योगदान दिले होते. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यासारख्या मातब्बर संघांना त्यांच्याच भूमीत प्रथमच नमविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या वाडेकरांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात विजयाचा एक नवा अध्याय सुरू केला. आक्रमक फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या वाडेकरांनी मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्रिकेटशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली होती.  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com