agriculture news in marathi, Former Prime Minister Of India Dr Manmohan Singhs Birthday Special | Agrowon

वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ. मनमोहन सिंग यांचा उत्साह कायम
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 86 वा जन्मदिवस आहे. वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात त्यांचा उत्साह कायम आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म पंजाबमधील गाह गावात 26 सप्टेंबर 1932 साली झाला. सध्या हे गाव पाकिस्तानात आहे. काँग्रेससह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 86 वा जन्मदिवस आहे. वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात त्यांचा उत्साह कायम आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म पंजाबमधील गाह गावात 26 सप्टेंबर 1932 साली झाला. सध्या हे गाव पाकिस्तानात आहे. काँग्रेससह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जगातील कुशल अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी सन 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या काळात देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. युपीए सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. पण मनमोहन सिंग यांची प्रतिमा आजही प्रामाणिक, पारदर्शी आणि दूरदृष्टीचा नेता अशीच आहे. त्यांचा सहज आणि साधेपणा जनतेला नेहमीच भावतो.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपल्या माजी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दिर्षायुष्यासाठी प्रार्थना करतो.' असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत डॉ. मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या. 'डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्मदिवस आमच्यासाठी त्यांनी दिलेल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी कित्येक वर्षांपासून निस्वार्थ आणि मौल्यवान योगदानाला उजाळा देण्याची एक संधी आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देतो.' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

Dr Manmohan Singh

 

इतर ताज्या घडामोडी
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...