दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
‘द्वारकधीश’कडून पंधरवड्यात ५५ हजार टन उसाचे गाळप
नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामातील पहिल्या पंधरा दिवसात ५५ हजार ३०० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.
नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामातील पहिल्या पंधरा दिवसात ५५ हजार ३०० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. तर, ५० हजार ४३३ साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. साखर उतारा ९.३६ टक्के इतका असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली.
कारखान्याने वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. (ता.२१अखेर) २६ लाख ४१ हजार ५०० युनिट महावितरण कंपनीस दिली आहे. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार बी- हेव्ही मॉलेशश पासून ''इथेनॉल'' प्रकल्प सुरू झाला आहे.
इथेनॉल, पहिल्या साखरेच्या भरलेल्या गाडीचे व सहवीज प्रकल्पाचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष शंकरराव सावंत, उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, तज्ज्ञ संचालक कैलास सावंत, सुशीला जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, इंजि. शंकर साळुंके, रोहिदास जाधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आजपर्यंतचा अनुभव व कारखान्याचे वेळोवेळी मार्गदर्शन, नियोजनाप्रमाणे उसाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्याने यंदाच्या गळीत हंगामाअखेर १२ टक्क्यांपर्यंत उतारा आणण्याचे ध्येय शेतकऱ्यांनी निश्चित केले आहे.
- सचिन सावंत, कार्यकारी संचालक, द्वारकाधीश साखर कारखाना.
- 1 of 1023
- ››