Forty per cent decline in the price of dairy cattle
Forty per cent decline in the price of dairy cattle

दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस टक्के घट

नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीत वाढ होत असते. दुभती जनावरे खरेदी- विक्रीतून शेतकरी आर्थिक स्त्रोत मिळवतात. मात्र, तीन महिन्यांपासून आठवडीबाजार बंद आहेत. दुधाच्या दरातही घट झाल्याचा जनावरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. त्याचाही मोठा फटका दूध उत्पादकांनाच सोसावा लागत आहे. दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरच दूध उत्पादनाचे गणित मांडले जाते.

नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीत वाढ होत असते. दुभती जनावरे खरेदी- विक्रीतून शेतकरी आर्थिक स्त्रोत मिळवतात. मात्र, तीन महिन्यांपासून आठवडीबाजार बंद आहेत. दुधाच्या दरातही घट झाल्याचा जनावरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. त्याचाही मोठा फटका दूध उत्पादकांनाच सोसावा लागत आहे. दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरच दूध उत्पादनाचे गणित मांडले जाते.

नगर जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), लोणी (राहाता) बेलवंडी (श्रीगोंदा), वाळकी (नगर) येथील आठवडी बाजार दुभत्या गाई-म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. लोणीच्या आठवडी बाजारात परराज्यातून गाईची खरेदी विक्री होते. घोडेगावचा बाजार म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. सद्यःस्थितीत दुभत्या जनावरांच्या किमतीही पन्नास टक्क्यांनी घटल्या आहेत.

सहा महिन्यांपूर्वी दुभत्या संकरित गाईंची सत्तर हजारांपासून एक लाखापर्यंत खरेदी-विक्री व्हायची. म्हशीची किंमतही पन्नास हजारांपासून एक लाखांपर्यंत होती. आता संकरित गाईची किंमत पन्नास हजाराच्या आत आली आहे. म्हैसही पन्नास साठ हजाराला मागितली जात आहे. खरेदी-विक्री थांबल्याने व दरही कमी झाल्याने महागडा चारा, खुराक देऊन जनावरे पोसण्याची वेळ दूध उत्पादकांवर आली आहे. आता आतबट््टयात असलेल्या दूध व्यवसायाची कोंडी कोण व कशी फोडणार? असा प्रश्‍न हजारो शेतकऱ्यांना पडला आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दुभत्या जनावरांची खरेदी-विक्री होत असते. त्यावरच दूध उत्पादनाचे गणित बहुतांश शेतकरी मांडतात. यंदा आठवडी बाजार बंद आहेत. शिवाय दुधाचे दर पडल्याने जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे दूध व्यवसायाची कोंडी झाली आहे. - मंगश कान्होरे, दूध उत्पादक शेतकरी, घारगाव, ता. संगमनेर, जि. नगर.

विरोधक, शेतकरी नेते गप्प कसे बसलेत नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात दूध उत्पादक अडचणीत आहेत. दूध उत्पादकांची वरचेवर कोंडी होत आहे. उत्पादकांच्या  दुधाचे दर पाडले. मात्र, दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचे दर कमी केले नाहीत. दूध संघ त्यांना वाटेल तो दर देत दूध उत्पादकांची पिळवणूक करत असताना दूध प्रश्नाचे भांडवल करणारे विरोधक, शेतकरी नेते सध्याच्या दूध प्रश्नावर गप्प का आहेत, तोट्यात दूध व्यवसाय करत पिळवणूक सहन करणाऱ्या दूध उत्पादकांची बाजू कोणी घेणार की नाही असा प्रश्न शेतकरी नेते सुरेश नवले यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित करत आहेत. (समाप्त)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com