Agriculture news in Marathi Forty per cent decline in the price of dairy cattle | Page 2 ||| Agrowon

दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस टक्के घट

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 10 जुलै 2020

नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीत वाढ होत असते. दुभती जनावरे खरेदी- विक्रीतून शेतकरी आर्थिक स्त्रोत मिळवतात. मात्र, तीन महिन्यांपासून आठवडीबाजार बंद आहेत. दुधाच्या दरातही घट झाल्याचा जनावरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. त्याचाही मोठा फटका दूध उत्पादकांनाच सोसावा लागत आहे. दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरच दूध उत्पादनाचे गणित मांडले जाते.

नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीत वाढ होत असते. दुभती जनावरे खरेदी- विक्रीतून शेतकरी आर्थिक स्त्रोत मिळवतात. मात्र, तीन महिन्यांपासून आठवडीबाजार बंद आहेत. दुधाच्या दरातही घट झाल्याचा जनावरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. त्याचाही मोठा फटका दूध उत्पादकांनाच सोसावा लागत आहे. दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरच दूध उत्पादनाचे गणित मांडले जाते.

नगर जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), लोणी (राहाता) बेलवंडी (श्रीगोंदा), वाळकी (नगर) येथील आठवडी बाजार दुभत्या गाई-म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. लोणीच्या आठवडी बाजारात परराज्यातून गाईची खरेदी विक्री होते. घोडेगावचा बाजार म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. सद्यःस्थितीत दुभत्या जनावरांच्या किमतीही पन्नास टक्क्यांनी घटल्या आहेत.

सहा महिन्यांपूर्वी दुभत्या संकरित गाईंची सत्तर हजारांपासून एक लाखापर्यंत खरेदी-विक्री व्हायची. म्हशीची किंमतही पन्नास हजारांपासून एक लाखांपर्यंत होती. आता संकरित गाईची किंमत पन्नास हजाराच्या आत आली आहे. म्हैसही पन्नास साठ हजाराला मागितली जात आहे. खरेदी-विक्री थांबल्याने व दरही कमी झाल्याने महागडा चारा, खुराक देऊन जनावरे पोसण्याची वेळ दूध उत्पादकांवर आली आहे. आता आतबट््टयात असलेल्या दूध व्यवसायाची कोंडी कोण व कशी फोडणार? असा प्रश्‍न हजारो शेतकऱ्यांना पडला आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दुभत्या जनावरांची खरेदी-विक्री होत असते. त्यावरच दूध उत्पादनाचे गणित बहुतांश शेतकरी मांडतात. यंदा आठवडी बाजार बंद आहेत. शिवाय दुधाचे दर पडल्याने जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे दूध व्यवसायाची कोंडी झाली आहे.
- मंगश कान्होरे, दूध उत्पादक शेतकरी, घारगाव, ता. संगमनेर, जि. नगर.

विरोधक, शेतकरी नेते गप्प कसे बसलेत
नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात दूध उत्पादक अडचणीत आहेत. दूध उत्पादकांची वरचेवर कोंडी होत आहे. उत्पादकांच्या  दुधाचे दर पाडले. मात्र, दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचे दर कमी केले नाहीत. दूध संघ त्यांना वाटेल तो दर देत दूध उत्पादकांची पिळवणूक करत असताना दूध प्रश्नाचे भांडवल करणारे विरोधक, शेतकरी नेते सध्याच्या दूध प्रश्नावर गप्प का आहेत, तोट्यात दूध व्यवसाय करत पिळवणूक सहन करणाऱ्या दूध उत्पादकांची बाजू कोणी घेणार की नाही असा प्रश्न शेतकरी नेते सुरेश नवले यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित करत आहेत. (समाप्त)


इतर ताज्या घडामोडी
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...
रत्नागिरीत पावसाची उसंत; पूर ओसरू लागलारत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वारे वाहत असून...
महापुराच्या आठवणीने नदीकाठ भयभीतकोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून नद्यांच्या...
जळगाव जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये...जळगाव : जिल्ह्यात जळगाव, यावल, रावेर व बोदवड...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला...
नगर जिल्ह्यात दोन वर्षांपासून ज्वारी...नगर ः पंतप्रधान पीक विमा योजनेतून नगर जिल्ह्यातील...