नगर जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचे चाळीस टक्के क्षेत्र रिकामे

Forty percent of the area of gram in the nagar district is empty
Forty percent of the area of gram in the nagar district is empty

नगर : पावसाळ्याच्या अगदी शेवटाला चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आतापर्यंतच्या पेरणीनुसार ४० टक्के क्षेत्रात घट झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्ह्यामध्ये रब्बीत आतापर्यंत ७० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सरासरी १ लाख १८ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र आहे.

जिल्ह्यामध्ये रब्बीचे ६ लाख ६७ हजार २६० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात हरभऱ्याचे १ लाख १८ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा खरिपाची पिके चांगली आली नाहीत. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले. मात्र पावसाळ्याच्या शेवटी चांगला पाऊस झाला. कापुस व अन्य पिकांच्या जागी गहू व हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार कृषी विभागाने पेरणीसाठी बियाणे व खताचे नियोजन केले होते. मात्र आतापर्यंत झालेल्या पेरणीची परिस्थिती पाहता जिल्हाभरातील साधारण ४० टक्के म्हणजे ३० हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरणीची घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रब्बीच्या पेरणीमधील ज्वारी, हरभऱ्यासह काही पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामाची साठ टक्के पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय हरभऱ्याचे क्षेत्र (हेक्टरी)

नगर  ८,५४८
पारनरे ५,९०६
श्रीगोंदा ५,५४८
कर्जत १०,२७७
जामखेड  ३,३४०
शेवगाव  ६,१७०
पाथर्डी   ८,९५८
नेवासा  ५४५
राहुरी  १,९४९
संगमनेर  ४,२७३
अकोले १,७८८
कोपरगाव  ६,५६२
श्रीरामपूर १,०५७
राहाता  ५,३२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com