agriculture news in marathi forty thousand ton milk powder in State after lockdown : Ajit Narke | Agrowon

राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडून

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून आहे. पावडरचा बफर स्टॉक करण्याची वेळ आली आहे, असे मत इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केली. 

पुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून आहे. यामुळे खासगी व सहकारी दूध प्रकल्पांमध्ये तयार झालेले पावडरचे साठे ‘ना नफा - ना तोटा’ तत्त्वावर खरेदी करावेत. पावडरचा बफर स्टॉक करण्याची वेळ आली आहे, असे मत इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केली. 

‘कोरोना’च्या स्थितीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने डेअरी उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी सहकारी संघांचे रोज दहा लाख लीटर दूध खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात १० लाख लिटरवर ही खरेदी गेलीच नाही; तसेच या खरेदीपोटी मिळालेल्या २०० कोटींच्या निधीतील एक रुपया देखील वाटप केला गेलेला नाही. 

श्री. नरके म्हणाले, की दूध पावडरबाबत अशी स्थिती तीन वर्षांपूर्वी देखील आली होती. आत्ताचे चित्र मात्र जास्त भयावह आहे. केंद्र व राज्य सरकारने मतभेद विसरून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारण्यासाठी दूध पावडरचे बफर स्टॉक तयार करण्याबाबत तातडीने नियोजन केले पाहिजे. अडवलेले पेमेंट तातडीने अदा केले पाहिजे.

राज्यात सध्या ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाच्या समस्येला हाताळण्यासाठी पावडर निर्मिती हाच पर्याय आहे. तथापि, त्यात नियोजन अजिबात नाही. कोल्हापूरच्या गोकुळ संघात १८०० टन पावडर पडून आहे. इतर संघांचे सरकारने खरेदी केलेले दूध देखील ‘गोकुळ’मध्ये येते. त्याची रोज ५० टन पावडर केली जाते. मात्र, अजून सरकारने कोणतेही शुल्क तसेच अनुदान अदा केलेले नाही, असे ‘गोकुळ’चे म्हणणे आहे.

शिल्लक दूध पावडरचे चित्र

देशातील साठा  ७० हजार टन 
राज्यातील साठा  ४० हजार टन
पावडरचे दोन महिने आधीचे दर  ३३० रुपये प्रतिकिलो
पावडरचे सध्याचे दर  २७० ते २९० रुपये प्रतिकिलो
पावडरचा उत्पादन खर्च  २३० रुपये प्रतिकिलो

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...