नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस हजारांवर कर्जखाती विना ‘आधार’

forty thousand without connect 'Aadhaar' to loan accounts in Nanded, Parbhani districts
forty thousand without connect 'Aadhaar' to loan accounts in Nanded, Parbhani districts

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गंत नांदेड, परभणी जिल्ह्यांतील सुमारे ४ लाख २७ हजार ४७ शेतकरी पात्र आहेत. त्यांना अंदाजे २ हजार ६२७ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न असणे अनिवार्य आहे. दोन जिल्ह्यांतील ३ लाख ८६ हजार ४९७ शेतकऱ्यांची कर्जखाती आधारसंलग्न आहेत. परंतु, अद्याप ४० हजार ४८२ शेतकऱ्यांची कर्जखाती विना ‘अधार’ क्रमांक संलग्न आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील अंदाजे २ लाख २० हजार १४५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यापैकी १ लाख ९५ हजार १२२ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न आहेत. उर्वरित २५ हजार २३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी तत्काळ संपर्क करून आपले कर्जखाते आधारक्रमांकाशी संलग्न करून घ्यावे. त्याशिवाय कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. 

नांदेड जिल्ह्यात सुरुवातीला ४९ हजार ५०६ शेतकऱ्यांची बॅंक कर्जखाती आधार क्रमांकाशी संलग्न नव्हती. परंतु, मंगळवारी (ता. १३) आणि बुधवारी (ता. १५) जिल्ह्याभरात गावपातळीवर आधार क्रमांक जोडणी शिबिरे झाली. त्यामुळे आधार क्रमांक संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या २५ हजारांपर्यंत कमी झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ९०४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यांना १ हजार ६६ कोटी ९६ लाख ४४ हजार १२४ रुपयांची कर्जमाफी मिळेल. पात्र शेतकऱ्यांपैकी १ लाख ९१ हजार ३७५ शेतकऱ्यांचे कर्जखाते आधार क्रमांकाशी संलग्न आहे. परंतु, अद्याप १५ हजार ४५९ शेतकऱ्यांची कर्जखाती आधार क्रमांशी संलग्न नसल्याची स्थिती आहे. 

मदत कक्षाची स्थापना

कर्जमाफी योजनेची माहिती देण्यासह शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या गावात प्रसिद्ध कराव्या. गावस्तरावर याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी करून संबंधित खातेदारांनी दोन दिवसांत बँकेत जाऊन बँक खाते आधार क्रमांक संलग्न करावा, असे आवाहन डोंगरे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले.

कर्जमाफी स्थिती (रक्कम कोटींत)

जिल्हा शेतकरी संख्या  रक्कम  आधारलिंक खाती विनाआधार खाती
नांदेड २२०१४५ १३६०.९४ १९५१२२ २५०२३
परभणी २०६९०४ १२६६.९६  १९१३७५  १५४५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com