अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या सावकारी कर्जाचा बोजा

अमरावती जिल्ह्यात २०२० मध्ये ५७२ परवानाधारक सावकारांच्या माध्यमातून ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले, असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या सावकारी कर्जाचा बोजा
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या सावकारी कर्जाचा बोजा

अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत हात आखडता घेतला जातो. विविध त्रुटी काढून कर्ज नाकारले जाते. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना सावकाराची पायरी ओलांडावी लागते. जिल्ह्यात २०२० मध्ये ५७२ परवानाधारक सावकारांच्या माध्यमातून ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले, असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.  परवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांना बिगर कृषी कर्ज देण्यात आले आहे. याशिवाय ९५ हजार १८५ शेतकऱ्यांना ३८ कोटी २६ लाख १६ हजाराचे तारण कर्ज वाटण्यात आले. १३४० शेतकऱ्यांना ४ कोटी ५१ लाख ६७ हजाराचे बिगर तारण कर्जवाटप करण्यात आले. याप्रमाणे एकूण ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपये कर्ज वाटण्यात आले आहे. सहकार विभागाकडून या सावकारांना परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील कर्जवाटपाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध असली तरी अवैध सावकारांनी त्यापेक्षा अधिक कर्ज जिल्ह्यात वाटल्याचा अंदाज आहे.  सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये जिल्ह्यात २७५ प्रकरण दाखल आहेत. यापैकी २३६ प्रकरणात कलम १६ अन्वये अभिलेख, दस्तऐवज तपासणी करण्यात आली. ३९ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. यापैकी २०४ प्रकरणांत सहकार विभागाला तथ्य आढळले नाही. ३२ व्यक्‍ती अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील २९ व्यक्‍तींविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अधिकृत सावकारांकडून वतारण कृषी कर्जासाठी वर्षाला ९ टक्‍के, बिगर तारणसाठी १२, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ आणि बिगर कृषी बिगर तारणासाठी १८ टक्‍के व्याजदर आकारला जातो. जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या २८० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणे हे देखील एक कारण समोर आले आहे.  तालुकानिहाय इतके शेतकरी आहेत कर्जबाजारी

  • अमरावती : २७,४८९ 
  • भातकुली : १,९१८ 
  • मोर्शी : १,९०७ 
  • अंजनगावसुर्जी : २६४ 
  • धामणगावरेल्वे : २,८१६ 
  • वरुड : १,३३४ 
  • अलचपूर : ५०,१२५ 
  • धारणी : ३१९ 
  • नांदगाव खंडेश्‍वर : २४२ 
  • चांदूर रेल्वे : ३,८०८ 
  • चांदूरबाजार : १,३३४ 
  • तिवसा : १,८६२ 
  • दर्यापूर : ३,१०७
  • एकूण : ९६,५२५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com