agriculture news in marathi forty three crore Moneylender loan burden on farmers in Amravati | Page 2 ||| Agrowon

अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या सावकारी कर्जाचा बोजा

ॲग्रोवन वृत्तसेवा 
सोमवार, 25 जानेवारी 2021

अमरावती जिल्ह्यात २०२० मध्ये ५७२ परवानाधारक सावकारांच्या माध्यमातून ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले, असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत हात आखडता घेतला जातो. विविध त्रुटी काढून कर्ज नाकारले जाते. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना सावकाराची पायरी ओलांडावी लागते. जिल्ह्यात २०२० मध्ये ५७२ परवानाधारक सावकारांच्या माध्यमातून ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले, असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

परवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांना बिगर कृषी कर्ज देण्यात आले आहे. याशिवाय ९५ हजार १८५ शेतकऱ्यांना ३८ कोटी २६ लाख १६ हजाराचे तारण कर्ज वाटण्यात आले. १३४० शेतकऱ्यांना ४ कोटी ५१ लाख ६७ हजाराचे बिगर तारण कर्जवाटप करण्यात आले. याप्रमाणे एकूण ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपये कर्ज वाटण्यात आले आहे. सहकार विभागाकडून या सावकारांना परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील कर्जवाटपाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध असली तरी अवैध सावकारांनी त्यापेक्षा अधिक कर्ज जिल्ह्यात वाटल्याचा अंदाज आहे. 

सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये जिल्ह्यात २७५ प्रकरण दाखल आहेत. यापैकी २३६ प्रकरणात कलम १६ अन्वये अभिलेख, दस्तऐवज तपासणी करण्यात आली. ३९ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. यापैकी २०४ प्रकरणांत सहकार विभागाला तथ्य आढळले नाही. ३२ व्यक्‍ती अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील २९ व्यक्‍तींविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

अधिकृत सावकारांकडून वतारण कृषी कर्जासाठी वर्षाला ९ टक्‍के, बिगर तारणसाठी १२, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ आणि बिगर कृषी बिगर तारणासाठी १८ टक्‍के व्याजदर आकारला जातो. जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या २८० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणे हे देखील एक कारण समोर आले आहे. 

तालुकानिहाय इतके शेतकरी आहेत कर्जबाजारी

  • अमरावती : २७,४८९ 
  • भातकुली : १,९१८ 
  • मोर्शी : १,९०७ 
  • अंजनगावसुर्जी : २६४ 
  • धामणगावरेल्वे : २,८१६ 
  • वरुड : १,३३४ 
  • अलचपूर : ५०,१२५ 
  • धारणी : ३१९ 
  • नांदगाव खंडेश्‍वर : २४२ 
  • चांदूर रेल्वे : ३,८०८ 
  • चांदूरबाजार : १,३३४ 
  • तिवसा : १,८६२ 
  • दर्यापूर : ३,१०७
  • एकूण : ९६,५२५

इतर ताज्या घडामोडी
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...
रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी...जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व...
किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा...नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक...
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार...बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना...
बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते...जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला...
सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि...
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक...
उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य...
...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलोभारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच...