Forty villages selected for Kamdhenu Adoption Village
Forty villages selected for Kamdhenu Adoption Village

कामधेनू दत्तक ग्रामसाठी चाळीस गावांची निवड

पुणे ः दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यंदा पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादनासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे.

कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये पशुसंवर्धन गावांमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येकी एक लाख ५२ हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यासाठी जंतनाशक शिबिर, खनिज मिश्रण व जीवनसत्त्व पुरवठा, गोचीड, गोमाश्या निर्मूलन शिबिर, वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

गावात स्थापन केलेल्या पशुपालक मंडळाच्या सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणी आणि चाराटंचाईच्या कितीही अडचणी आल्या तरी शेतकरी त्यांच्याकडील पशुधन वाऱ्यावर सोडत नाही. हे वारंवार समोर आल्याने राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागाने कामधेनू ही योजना सुरू केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामधेून दत्तक ग्राम योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील २०१९-२० अंतर्गत गावांची निवड केली आहे.

यंदा निवड केलेल्या गावांमध्ये पशुपालक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक दत्तक गावात ग्रामसभा घेऊन गोपालन, शेळीपालन, चारा व्यवस्थापन, मलमूत्र व्यवस्थापन, गांडूळ खतनिर्मिती, मुरघासनिर्मिती, अनुषंगिक पशुधन संगोपनाची माहितीही देण्यात येत आहे. वेळोवेळी जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर घेऊन जंत व वंध्यत्व घेऊन या गावांमधील मंडळाची शैक्षणिक सहलीचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. तसेच तालुका स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायासारख्या पूरक व्यवसायाकडे वळून दुधाचे उत्पादन वाढावे हा मुख्य उद्देश आहे. म्हणून ही योजना राबविण्यात येत असून त्यासाठी चाळीस गावांची निवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. - डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com