agriculture news in marathi, forward market weekly analysis | Agrowon

मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कल
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे. हळदीच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी अधिक आहेत. हरभऱ्याच्या सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जानेवारीमधील फ्युचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत.

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे. हळदीच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी अधिक आहेत. हरभऱ्याच्या सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जानेवारीमधील फ्युचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत.

देशाच्या काही भागांत अजून पाऊस सुरू आहे. सणामुळे शेतमालाची मागणी वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात खरिपाची आवक वाढत नाही. त्यामुळे या सप्ताहात बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढले (आलेख १). पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा अजून अंदाज येत नसल्याने जानेवारी २०२० च्या किमतींमध्येसुद्धा वाढ दिसत आहे. (आलेख २). नोव्हेंबरच्या सुरुवातीस खरीप पिकाच्या आवकेस वेग येईल, असा अंदाज आहे. त्यानंतर तिचा किमतींवर परिणाम दिसू लागेल. 

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार ः
मका (रब्बी)
रब्बी मक्याच्या (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १३ तारखेपर्यंत उतरत होत्या (२,१८७ ते रु. २,०८९). त्यानंतर वाढत गेल्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी घसरून रु. २,१२६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,११६ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. डिसेंबर डिलिव्हरीचे भाव रु. १,९९० आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. डिसेंबर मधील भाव (रु. २,१३६) हमीभावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे. 

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,४८६ ते रु. ३,८२१). गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,६५७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,७१७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,७४७ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. चीन व अमेरिकेमधील संबंध अजूनही सुधारलेले नाहीत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. जानेवारी डिलिव्हरीसाठी रु. ३,७९० भाव आहे. नंतरच्या महिन्यांसाठी (फेब्रुवारी व मार्च २०२० डिलिव्हरीसाठी) तो अनुक्रमे रु. ३,८३९ व रु. ३,८५० आहे. 

हळद
हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये उतरत होत्या. (रु. ६,९३८ ते रु. ६,१४०). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,९३८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,००० वर स्थिर आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,१४०). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.  

गहू
गव्हाच्या (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात रु. २,०७५ व रु. २,१३३ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी वाढून रु. २,१५१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,०८२ वर  आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२१४).  

गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ४,२१२ ते रु. ३,९८३). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,९३८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,८९५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जानेवारी मधील फ्युचर्स किमती ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०४८). या वर्षी राजस्थान मध्ये चांगला पाउस झाला आहे. नोव्हेंबरमध्ये किमती घसरण्याचा संभव आहे. 

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,०२५ ते रु. ४,३८६). गेल्या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,३७४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,४९८ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४१७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जानेवारीमधील फ्युचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४७५). शासनाकडे पुरेसा साठा आहे.  मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये वाढीव मागणीमुळे किमती वाढण्याची शक्यता आहे. 

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये रु. १९,०७० व रु. १९,५०० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. १९,२६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,१६७ वर आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,४२० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.३ टक्क्यांनी अधिक आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

बासमती तांदूळ 
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,९०० वर आल्या आहेत.  

मूग 

मुगाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १८ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ६,२७८ ते ५,९९३). त्यानंतर त्या वाढू लागल्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ६,४२९ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,४०० वर आल्या आहेत. नवीन मूग या महिन्यात बाजारात येऊ लागला आहे; पण अजून तो पुरेसा नाही. जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. ६,४८९ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. आवक वाढेल तेव्हा भाव घसरण्याची शक्यता आहे.  

(टिप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी). 
       
-  डॉ. अरुण प्र. कुलकर्णी ः arun.cqr@gmail.com

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई  ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...
सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...
मंदीतून सावरण्यासाठी उद्योग क्षेत्राला...पणजी : देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला...
हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत...हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...