सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कल

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

एनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा यांच्या भावात वाढ झाली. इतर पिकात घसरण झाली. या सप्ताहात सर्वात अधिक घसरण साखरेत (३ टक्के) झाली. गवार बी व हरभऱ्यातील वाढ ३ टक्क्यांहून अधिक होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सर्व पिकांचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहात अमेरिकी शेती खात्याने २०१८-१९ या वर्षासाठी जागतिक उत्पादन व खप यांचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे.

  • तांदळाचे उत्पादन गेल्या वर्षी (२०१७-१८) सर्वाधिक होते. या वर्षी ते पुन्हा वाढून नवीन उच्चांक गाठेल. त्या मानाने खप कमी प्रमाणात वाढेल व वर्षअखेरचा साठा किंचित वाढेल.
  • भारत हा प्रमुख निर्यातदार असेल व त्या खालोखाल थायलंड असेल.
  • गव्हाचे जागतिक उत्पादन गेल्या वर्षी उच्चांकी होते. या वर्षी ते घसरेल. खप मात्र वाढता राहील व तो उत्पादनापेक्षा अधिक असेल. त्यामुळे वर्षअखेरचा साठा गेल्या वर्षापेक्षा कमी असेल.
  • मक्याचे जागतिक उत्पादन २०१६-१७ मध्ये उच्चांकी होते. गेल्या वर्षी ते घसरले. या वर्षी ते वाढेल, मात्र ते २०१६-१७ ची पातळी गाठणार नाही.
  • मक्याचा खप मात्र उत्पादनापेक्षा अधिक असेल. त्यामुळे वर्षअखेरचा साठा गेल्या वर्षापेक्षा कमी असेल.
  • तेलबियांचे उत्पादन या वर्षी किंचित वाढेल. अर्जेन्टिना दुष्काळातून बाहेर येईल व त्यामुळे सोयाबीनचे जागतिक उत्पादन वाढेल.
  • बहुतेक सर्व तेलबियांचा खप वाढत्या प्रमाणावर असेल. सोयाबीनची निर्यात मागणी वाढेल. सोयाबीन व इतर तेलबियांचा वर्ष- अखेरचा साठा गेल्या वर्षापेक्षा कमी असेल.
  • भारतात या वर्षी सर्व साधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय व इतर हवामान खात्यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे.
  • गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (जून २०१८) किमती २० एप्रिलपर्यंत रु. १२३१ पर्यंत वाढल्या होत्या. नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी घसरून रु. १,१६९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१६० वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१८६ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. मे महिन्यात किमतीत मर्यादित चढ-उतार होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३ टक्क्यांनी घसरून रु. २,६३१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,६१३ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,६३१ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,८०२ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७५४ वर आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,८२० वर आल्या आहेत. निर्यात मागणी वाढू लागली आहे. तेलावरील आयात मूल्य वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिका-चीन मधील व्यापार पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस भावात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिलमध्ये वाढत होत्या. गेल्या सप्ताहात ४.४ टक्क्यांनी वाढून त्यांनी रु. ७,५३४ ची पातळी गाठली होती. या सप्ताहात मात्र त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ७,३८२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती सुद्धा २.३ टक्क्यांनी घसरून रु. ७,५१० वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १ टक्क्याने अधिक आहेत (रु. ७,५८४). देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात्त मागणीसुद्धा वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमतीत वाढ अपेक्षित आहे. गहू गव्हाच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात रु. १,७११ ते रु. १,७७३ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. १,८०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७७० वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८६०). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती २० एप्रिलपासून घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,७८९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,९३१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. ३,८६३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,९७८). मे महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ३,५४४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,६७६ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६३४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४३). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारातील भाव वाढण्यावर होण्याचा संभव आहे. कापूस एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती १६ एप्रिल पर्यंत वाढत होत्या (रु. २१,४८०). नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २०,९०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,०९५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,०३०). किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com