प्रतापगड सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलचा सर्व २१ जागांवर विजय

जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीत सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
Founder panel wins all 21 seats in Pratapgad Co-operative Factory election
Founder panel wins all 21 seats in Pratapgad Co-operative Factory election

कुडाळ, जि. सातारा : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीत सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. सर्व उमेदवार सुमारे १२०० मताधिक्याने विजयी झाले आहेत. यापूर्वी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.  प्रतापगड कारखान्यासाठी १४ मार्चला मतदान झाले होते. त्यामध्ये ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता व सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. जावळी व महाबळेश्‍वर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या प्रतापगड कारखान्याची ६१५६ सभासद संख्या असून, यापैकी ३२१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी सौरभ शिंदे यांच्या पॅनेलने तीन जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेल विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारखाना बचाव पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली.  सोमवारी सकाळपासून सभासद मतदारांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले. मतमोजणी झाल्यानंतर मतदारांनी आपला कौल सौरभ शिंदे यांच्या बाजूने दिल्याचे हे सिध्द झाले. जसजसा निकाल जाहीर होत गेला तसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकवीस झिरो... सौरभबाबा हिरो..., संस्थापक पॅनेलचा विजय असो.., अशी घोषणाबाजी करण्यात आली.   

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com