सरपंच महापरिषदेचे संस्थापक जयंत पाटलांसह दोघांना अटक

सरपंच महापरिषदेचे संस्थापक जयंत पाटलांसह दोघांना अटक
सरपंच महापरिषदेचे संस्थापक जयंत पाटलांसह दोघांना अटक

सोलापूर : कुर्डु (ता. माढा) येथील स्वाभिमानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पतसंस्थेच्या दोन संचालकांना पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी (ता. २७) अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळासाहेब भगवान अनंतकळस (वय ६३, रा. दौंड) यांनी यासंबंधीची  फिर्याद दिली आहे. अनंतकळस यांनी यासंबंधी ३ एप्रिल रोजी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर पोलिसांनी चौकशीअंती यामध्ये तातडीने पावले उचलली. संशयितांना अटक केली. कुर्डु येथील ही पतसंस्था प्रसिद्ध अशा पतसंस्थांपैकी एक म्हणून गौरवली जाते. पतसंस्थेच्या या प्रकरणात सुमारे दोन लाख ५७ हजार ४२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका आहे.  पाटील यांच्यासह संचालक बबन ढाणे, ज्ञानदेव घुंगुर्डे यांनाही यामध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी लगेच त्यांना माढा न्यायालयात उभे केले. न्या. एस. एस. सय्यद यांनी त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. संशयितांच्या वतीने ॲड. हरिष कांबळे आणि सरकारी वकील म्हणून विशाल सक्री काम पाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com