नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत सातबारा

नांदेड : जिल्ह्यात महसूल विभागातर्फे दोन आक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांना घरपोच मोफत सातबारा देणार येणार आहे. हा सातबारा सर्वांनी बारकाईने बघून त्यातील बदल तसेच काही चुका असल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्याव्यात, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Four and a half lakh farmers in Nanded district will get free Satbara

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महसुल विभागाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा मोफत घरपोच देण्यात येणार आहे. संगणकीकृत सातबारा तयार करताना त्यात आवश्यक बदल केले आहेत. यासोबतच सातबाऱ्यावरील अनेक अनावश्यक नोंदी काढल्या जाणार आहेत. सातबाऱ्यासोबत ‘आठ अ’ देखील ऑनलाइन मिळणार आहे.

 जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ सातबाराधारक शेतकरी आहेत. तर या सातबारावर असलेले खातेदारांची संख्या काढण्याचे काम सध्या सुरु आहे. या सर्व खातेदारांना आगामी दोन आक्टोबर रोजी घरपोच मोफत  सातबारा मिळेल. 

जिल्ह्यात ५९ हजार २४ सातबाराधारक 

जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ सातबाराधारक शेतकरी आहेत. एका सातबारावर एकापेक्षा अधिक खातेदारांची नावे असतात. जिल्ह्यात सातबाराधारक शेतकरी संख्या उपलब्ध आहे. परंतु सध्या खातेदारांची संख्या उपलब्ध नाही. आगामी काही दिवसांत खातेदारांची संख्याही कळेल, असे महसूलच्या सूत्राने सांगितले. यातून जिल्ह्यातील खातेदार शेतकरी कळतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com