परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नऊ कारखान्यांकडून साडेचार लाख टन उसाचे गाळप

परभणी : यंदाच्या हंगामात परभणी जिल्ह्यातील पाच, हिंगोली जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी मंगळवार (ता.२४) पर्यंत ४ लाख ४८ हजार १४२ टन उसाचे गाळप केले आहे.
 Four and a half lakh tonnes of sugarcane crushed from nine mills in Parbhani, Hingoli district
Four and a half lakh tonnes of sugarcane crushed from nine mills in Parbhani, Hingoli district

परभणी : यंदाच्या हंगामात परभणी जिल्ह्यातील पाच, हिंगोली जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी मंगळवार (ता.२४) पर्यंत ४ लाख ४८ हजार १४२ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून एकूण ३ लाख २७ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

यंदा परभणी जिल्ह्यातील सहा खासगी साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप सुरु आहे. कानडेखेड (ता.पूर्णा) येथील बळिराजा शुगर कारखान्याने ८५ हजार १४५ टन ऊस गाळप केला. ८.२ टक्के उताऱ्याने ६९ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. देवनांद्रा (ता.पाथरी) येथील रेणुका शुगर कारखान्याने ३६ हजार ९० टन उसाचे गाळप केले. ७.४५ टक्के उताऱ्याने २६ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.

लिंबा (ता.पाथरी) येथील योगेश्वरी शुगर्सने ४१ हजार ५२ टन ऊस गाळप केले. ७.१४ टक्के उताऱ्याने २९ हजार ३२० क्विंटल साखर उत्पादन घेतले. आमडापूर (ता.परभणी) येथील त्रिधारा शुगर्सने ५३ हजार ३३० टन ऊस गाळप केले. ६.७८ टक्के उताऱ्याने ३६ हजार १५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सायखेडा (ता.सोनपेठ) येथील ट्वेंटीवन शुगर कारखान्याने ६९ हजार २४५ टन गाळप, तर ५.९ टक्के  उताऱ्याने ४० हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जिल्ह्यातील एकूण पाच साखर कारखान्यांनी २ लाख ८४ हजार ८८६ टन उसाचे गाळप केले. सरासरी ७.१३ टक्के उताऱ्याने २ लाख ३ हजार ७० क्विंटल साखर  उत्पादन घेतले.

हिंगोली जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट दोनने १८ हजार २१० टन उसाचे गाळप केले. ६.५२ टक्के उताऱ्याने ११ हजार ८८० क्विंटल साखर उत्पादन घेतले. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ४९ हजार ९३० टन ऊस गाळप केला. ७.७५ टक्के उताऱ्याने ३८ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. 

पूर्णा सहकारी साखर कारखाना युनिट दोन (बाराशिव हनुमान) ने ४४ हजार ९४० टन उसाचे गाळप केले. ७.२२ टक्के उताऱ्याने ३२ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन, शिरूर शुगर्सने ५० हजार २०० टन गाळप, तर ८.२६ टक्के उताऱ्याने ४१ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी एकूण १ लाख ६३ हजार २८० टन उसाचे गाळप केले. सरासरी ७.६२ टक्के उताऱ्याने १ लाख २४ हजार ४८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com