Agriculture News in Marathi Four and a half thousand rupees Give the first installment to Usa | Page 2 ||| Agrowon

साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला द्या 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

यंदा उसाला उत्पादन खर्चावर आधारित एकरकमी एफआरपी ४५०० रुपये प्रति टन पहिला हप्ता मिळावा, असा ठराव कुंभी कारखाना येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. 

कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन खर्चावर आधारित एकरकमी एफआरपी ४५०० रुपये प्रति टन पहिला हप्ता मिळावा, असा ठराव कुंभी कारखाना येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. 

शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश संघटना व बळीराजा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी संघटनेला पाठिंबा देत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांनी यंदा उसाला ‘एफआरपी’चा ४५०० पहिला हप्ता मिळावा, सर्व ग्रामपंचायतींनी ठराव करून आमदारांकडे द्यावेत. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू करू नयेत, अशी मागणी करण्यात आली. 

आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सामुदायिक विरोध केला तरच एकरकमी एफआरपी मिळेल, तीन टप्प्यांत दिल्यास १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे लागेल, असे आयुक्तांचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण दिले. सरपंच जोत्स्ना पाटील यांनी एकरकमी एफआरपी देण्यासाठी ठराव केल्याचे सांगून सर्व ग्रामपंचायतींनी ठराव करून आमदारांकडे द्यावेत, अशी मागणी केली. 

युवराज आडनाईक, आनंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दादूमामा कामिरे यांचे मनोगत झाले. बदाम शेलार यांनी आभार मानले. गुणाजी शेलार, नारायण मोरे, के. एन. किरुळकर, तानाजी शेलार, युवराज पाटील, तुकाराम आडनाईक, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...