परभणीतील चार केंद्रांवर १५ हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी 

राज्य सहकारी उत्पादक पणन महासंघातर्फे २०२०-२१च्या हंगामात परभणी जिल्ह्यातील चार केंद्रांवर १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा ४ लाख ८२ हजार ३७६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
   परभणीतील चार केंद्रांवर   १५ हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी  At four centers in Parbhani  Farmers buy cotton at Rs 15,000
  परभणीतील चार केंद्रांवर  १५ हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी  At four centers in Parbhani Farmers buy cotton at Rs 15,000

प रभणी : राज्य सहकारी उत्पादक पणन महासंघातर्फे २०२०-२१च्या हंगामात परभणी जिल्ह्यातील चार केंद्रांवर १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा ४ लाख ८२ हजार ३७६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. खुल्या बाजारातील कापसाचे दर आधारभूत किंमतीपेक्षा जास्त असल्यामुळे शेतकरी येत नसल्याने महासंघाची खरेदी बंद आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके यांनी दिली. 

कापूस खरेदी प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंर्गत ५४ हजार ५७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

गेल्या काही दिवसांत खुल्या बाजारातील कापसाचे दर सहा हजारांवर गेले. त्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी पणनच्या केंद्रावर कापूस विक्रीकडे पाठ फिरवली. त्यामुळे यंदा पणनची कापूस खरेदी लवकरच बंद झाली. यंदा जिल्ह्यातील चार केंद्रांच्या अंतर्गतच्या १७ जिनिंग कारखान्यांमध्ये १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा ४ लाख ८२ हजार ३७६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com