agriculture news in marathi, four Chinook helicopters in Indian Air Force | Page 2 ||| Agrowon

हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामील

वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

चंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत बदल होईल, असा विश्‍वास हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सोमवारी (ता.२५)  येथे व्यक्त केला. अमेरिकन बनावटीची ही चार हेलिकॉप्टर आज एका कार्यक्रमात हवाई दलात सामील करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

चंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत बदल होईल, असा विश्‍वास हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सोमवारी (ता.२५)  येथे व्यक्त केला. अमेरिकन बनावटीची ही चार हेलिकॉप्टर आज एका कार्यक्रमात हवाई दलात सामील करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

बोइंग कंपनीबरोबर सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या करारानुसार, भारत १५ ‘सीएच-४७ एफ (आय)' हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. हा व्यवहार १.५ अब्ज डॉलरचा आहे. त्यातील पहिली चार हेलिकॉप्टर आज दाखल झाली. हवाई दलाच्या १२६ व्या हेलिकॉप्टर युनिटमध्ये ती सेवा बजावतील. ऊर्वरित हेलिकॉप्टर २०२० पर्यंत दाखल होतील. यातील काही आसाममधील दिनजान तळावर कार्यरत राहतील.

उंच प्रदेशात अवजड सामग्री वाहून नेण्याची क्षमता हे ‘चिनुक'चे वैशिष्ट्य आहे. सैनिकांची ने-आण करणे, लष्करी वाहने उचलून नेणे तसेच तोफा, इंधन व शस्त्रसामग्रीच्या वाहतुकीसाठीसुद्धा ती उपयुक्त आहेत. या हेलिकॉप्टरला दोन इंजिने आहेत. दिवसाप्रमाणे रात्रीही वापरता येणे हा या हेलिकॉप्टरचा आणखी एक फायदा आहे. मदतकार्यातही ही हेलिकॉप्टर वापरता येऊ शकतात.

दुर्गम प्रदेशात लष्करी सामग्री वाहून नेण्याचे आव्हान सुरक्षा दलांपुढे असते. हवाई दलाचे वैमानिक समुद्रसपाटीपासून अति उंचावरच्या प्रदेशांत कार्यरत असतात. "चिनुक'च्या समावेशामुळे आता दुर्गम प्रदेशांत सामग्री नेणे सुलभ होईल, असे एअर चीफ मार्शल धनोआ यांनी नमूद केले. या वेळी हवाई दलाच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल आर. नम्बियार, बोइंगचे भारतातील प्रमुख सलिल गुप्ते तसेच अमेरिकेचे मेजर जनरल रॉबिन फॉंट्‌स उपस्थित होते.

१९ देशांत कार्यरत
अवजड सामग्री वाहून नेण्याची क्षमता हे 'चिनुक'चे वैशिष्ट्य आहे. ते एकावेळी ११ टन वजन आणि ४५ सैनिक नेऊ शकते. ही हेलिकॉप्टर सध्या ब्रिटन, कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती, इटली, ऑस्ट्रेलिया, स्पेन, नेदरलॅंड, ग्रीस आदी १९ देशांच्या सैन्यांमध्ये कार्यरत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
जल प्रदुषण रोखण्यासाठी पूर्णा...अकोला ः पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर...
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊसलातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड...
`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर...बुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती...
परभणीत राष्ट्रीयकृत, खासगी बॅंकाचे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरिपात मंगळवार (ता.१५)...
कांदेबाग केळी लागवडीची तयारी पूर्ण,...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
खानदेशात रब्बीसाठी सव्वालाख टन खतांची...जळगाव  ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा खरिपातील...
गरज संरक्षित जल सिंचनाचीसंरक्षित सिंचन व्यवस्था हा एक चांगला पर्याय...
सांगलीत मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी...सांगली ः खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान...
रत्नागिरीतील चारच मंडळात काजू पिकाचा...रत्नागिरी : हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या...
केळी वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत द्यावीरावेर, जि. जळगाव : ‘व्हीपीयू’ प्रकारच्या...
अकोला जिल्ह्यात पावसाने उडदाचे ८४००...अकोला ः जिल्ह्यात या हंगामात मुगाच्या पिकापाठोपाठ...
रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजनरब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक...
फळबाग सल्ला (कोकण विभाग) आंबा  वाढीची अवस्था  पावसाची...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी सचिव डवले यांनी घेतला `महाबीज`चा...अकोला ः आगामी रब्बी हंगामासाठी `महाबीज`कडे...
जळगाव जिल्ह्यात उडदाला नीचांकी दरजळगाव : एकीकडे उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात...
`उजनी`तून `भीमा`त ३० हजार क्‍युसेकने...सोलापूर : उजनी धरणामध्ये वरच्या धरणातून येणाऱ्या...
जस्तगावातील सोयाबीनचा विमा मंजूर करातेल्हारा, जि. अकोला :  तालुक्यातील जस्तगाव...
लातूरमध्ये पाऊस,‘तेरणा’ला पूरऔरंगाबाद : औरंगाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील सहा...
पुणे विभागात पेरणीत सव्वा तीन लाख...पुणे : चालू वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे...