नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
सटाणा तालुक्यात चार कोटींची नुकसानभरपाई मंजूर
सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झाले होते. तालुक्यातील १० हजार ८३१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ४ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर
नाशिक : सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाले होते. तालुक्यातील १० हजार ८३१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ४ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर मंजूर झाली असून, लवकरच अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २७) रोजी दिली.
या बाबत बोलताना चव्हाण म्हणाल्या, कोरोना संकटाशी सामना करीत असताना शेतकऱ्याला निसर्गाच्या संकटाने उध्वस्त केले आहे. तालुक्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. या पावसात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी चाळीतून बाहेर काढून ठेवलेला हजारो क्विंटल उन्हाळ कांदा आणि मका पूर्ण भिजला तर उन्हाळी कांद्याचे टाकलेले महागडे उळे सडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला. भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम झाला. वादळी पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर पडले होते.
राज्य शासनाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भेटी घेऊन आग्रही मागणी करण्यात आली होती. येत्या दोन दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उर्वरित पावणे दोन कोटींच्या अनुदानास मंजुरी मिळावी या करिता प्रयत्नशील असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
२८ गावांतील शेतकऱ्यांना मदत
तालुक्यातील तळवाडे भामेर, टेंभे खालचे, टेंभे वरचे, वाडी चौल्हेर, आराई, नवी शेमळी, जुनी शेमळी, रातीर, रामतीर, अजमिर सौंदाणे, खमताणे, नवेगाव, पिंपळदर, ठेंगोडा, दऱ्हाणे, इंदिरानगर, ब्राह्मणगाव, यशवंतनगर, सटाणा, मुंजवाड, कुपखेडा, कंधाणे, किकवारी खुर्द, अशा एकूण २८ गावांतील १० हजार ८३१ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून ४ कोटी २ लाख ७४ हजार ११५ रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली
आहे.
- 1 of 1028
- ››