agriculture news in Marathi, four days rain will not occur, Maharashtra | Agrowon

चार दिवस पावसाची उघडीप राहणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जुलै 2019

पुणे: उत्तर भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर शुक्रवारी (ता. १२) राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण वगळता राज्याच्या अंतर्गत भागात चार दिवस पावसाची उघडीप कायम राहणार आहे. 

पुणे: उत्तर भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर शुक्रवारी (ता. १२) राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण वगळता राज्याच्या अंतर्गत भागात चार दिवस पावसाची उघडीप कायम राहणार आहे. 

आज (ता. १३) राज्यात हलक्या पावसाचा, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा खूपच अडखळत सुरू आहे. केरळमध्ये उशिरा पोचल्यानंतर महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन खूपच लांबले. साधारणत: १५ जुलैपर्यंत मॉन्सून देश व्यापतो. यंदा वायव्य भारतातही मॉन्सूनची चाल मंदावली आहे. 

राजस्थान, पंजाब, हरियानाच्या काही भागांत अद्याप मॉन्सून दाखल झाला नसून, संपूर्ण देश व्यापण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने दोन दिवस घाटमाथा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला.

तर मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागासह, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. यातच कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असले तरी पावसाच्या सरी थांबल्या आहेत. बुधवारपर्यंत राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा शक्यता आहे. 

शुक्रवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : वेंगुर्ला १६०, चिपळूण १५०, राजापूर १३०, दोडामार्ग १२०, लांजा, श्रीवर्धन, सावंतवाडी, वैभववाडी, खेड प्रत्येकी ११०, मंडगणगड, मुलदे, हर्णे प्रत्येकी ९०, पोलादपूर ८०, तळा, कुडाळ, गुहागर ७०, देवगड, मालवण, कुलाबा प्रत्येकी ६०, रत्नागिरी, कणकवली, संगमेश्‍वर, देवरूख, महाड, रोहा, म्हसळा प्रत्येकी ५०. 
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा १६०, त्रिंबकेश्‍वर १४०, महाबळेश्‍वर १२०, पाटण ८०, इगतपुरी, पौड, राधानगरी, गारगोटी, वेल्हे प्रत्येकी ६०, लोणावळा, चंदगड प्रत्येकी ५०, आजरा, जावळीमेढा, पन्हाळा प्रत्येकी ४०, शाहूवाडी, खेड, कागल, अकोले, गडहिंग्लज, घोडेगाव प्रत्येकी ३०.  
मराठवाडा : देगलूर, मुखेड, बिलोली प्रत्येकी ५०, औंढा नागनाथ, सोनपेठ प्रत्येकी ४०, पूर्णा, जळकोट, परभणी, लोहारा, मंथा ३०, उदगीर, नायगाव खैरगाव, धर्माबाद, पाथरी, उस्मानाबाद, अर्धापूर, मानवत, गेवराई, माजलगाव प्रत्येकी २०.    
घाटमाथा : शिरगाव १७०, दावडी १४०, कोयना १३०, आंबोणे ९०, कोयना पोफळी, भिरा प्रत्येकी ८०, लोणावळा (टाटा) शिरोटा ७०, खंद ६०, भिवापुरी ४०, वळवण, वाणगाव, खोपोली ३०.

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...