agriculture news in marathi, four dies in lightning in yavtmal district | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात तुरळक गारपीट, वीज कोसळून चौघांचा मृत्यू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभे असलेल्या आठ जणांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले.

यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभे असलेल्या आठ जणांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्‍यात रविवार (ता.१५) दुपारी वादळी-वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हिवरा, कारंजखेड परिसरात तुरळक गारपीट झाली. महागाव तालुक्‍यातील वेणी बु. (सवना) शिवारात विजेने तांडव घातले. शेळ्या चारणाऱ्या काही जणांसह शेतमजुरांनी पावसापासून बचावाकरिता प्रल्हाद रामटेके यांच्या शेतातील निंबाच्या झाडाचा आसरा शोधला होता. परंतु पावसापासून बचावासाठीचा हा आसराच काळ ठरेल, अशी कल्पनाच या सर्वांना नव्हती.

दुपारी ४ वाजताच्या सुमारास या झाडावर वीज कोसळली. या घटनेत झाडाखाली असलेल्या आठ जणांपैकी चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. उर्वरित चौघे जखमी झाले. यासोबतच वीज कोसळण्याची दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब गावात घडली. या घटनेत सात शेळ्या ठार झाल्या.

मृत्यमुखी -
१) प्रभाकर नारायण जाधव (वय ४२), २ मुले, एक मुलगी, पत्नी.
२) पंडित दिगांबर हरणे (वय ३३), २ मुले, पत्नी.
३) अनिल विष्णू सरगुळे (वय २२) अविवाहित.
४) लक्ष्मण रमेश चोपडे, (वय २४) अविवाहित, शेतमजूर.

जखमी
१) जितेंद्र सुरदुसे (वय २३, वाकोडी)
२) बंडू सूर्यभान सरकाळे (वय ३२, रा. वेणी)
३) कैलास उत्तम सुरोशे (वय २३, रा. वेणी)
४) दत्ता गोविंद मदने (वय २३, रा. वेणी)
५) शिवाजी संभाजी बगळे (वय २६, रा. वेणी)

विदर्भात पावसाची हजेरी
विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामुळे भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात ब्राह्मणवाडा थडी (ता. चांदुरबाजार) परिसरात गारपीट झाली. या भागातील भाजीपाला उत्पादकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यातदेखील तुरळक पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...