agriculture news in marathi Four to Gawri in the town That rate of six thousand rupees | Page 3 ||| Agrowon

नगरमध्ये गवारीला चार ते सहा हजार रुपयांचा दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात सतत चढउतार होता. भाजीपाल्यात गवारची दर दिवसाला ८ ते १० क्विंटलची आवक झाली. दर पाच हजार ते सहा हजार रुपयाचा प्रतिक्विंटल मिळाला.

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात सतत चढउतार होता. भाजीपाल्यात गवारची दर दिवसाला ८ ते १० क्विंटलची आवक झाली. दर पाच हजार ते सहा हजार रुपयाचा प्रतिक्विंटल मिळाला. ओल्या भुईमूग शेंगालाही चांगला दर मिळत आहे. टोमॅटो, कोबी, काकडी, सिमला मिरचीचे दर पडले होते. भुसारमध्ये मुगाची आवक वाढली आहे. 

नगर येथील बाजार समितीत ९०० ते १ हजार क्विंटलपर्यंत दर दिवसाला भाजीपाल्याची आवक होत आहे. गेल्या आठवडाभरात वांग्यांची दर दिवसाला १५ ते १७ क्विंटलची आवक झाली.  दर १ हजार ते २ हजार, टोमॅटोची १८७ ते २०० क्विंटलची आवक होऊन ५०० ते ७००, फ्लॉवरची ४४ ते ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५००, घोसाळ्याची ५ ते ८ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, दोडक्याची ५० ते ५५ क्विटंलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, कारल्याची २२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार, वाल शेंगांची १३ ते १७ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला आहे. 

ओल्या भुईमूग शेंगांची २ ते ३ क्विंटलची आवक झाली. दर ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची ५५ ते ६० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार २००, शेवग्याची ९ ते १२ क्विंटलची आवक होऊन ५  हजार ते ६ हजार, मका कणसाची ३३ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १०००, शिमला मिरचीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ८०० रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, कढीपत्ता, मुळा, चुका, चवळी, वाटाण्याची आवक चांगली राहिली.  

मुगाची आवक वाढली 

जिल्ह्यात मुगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिवाय, शेजारच्या जिल्ह्यातूनही मूग विक्रीला येत आहे. त्यामुळे बाजार समितीत मुगाची आवक वाढली आहे. येथे दर दिवसाला ४ ते ५ हजार क्विंटलची आवक होत आहे. दर ४ हजार ते ७ हजार १०० रुपये मिळत आहे. गावरान ज्वारीला अडीच हजारापर्यंत, गव्हाला १६७५ पर्यंत, सोयाबीनला ८ हजार १०० पर्यंत, मक्याला २ हजारापर्यंत, हरभऱ्याला ५ हजार ३०० पर्यंत, उडदाला सात हजारापर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...