श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास थरारनाट्य 

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात रविवारी (ता. ५) बिबट्याने धुमाकूळ घातला. त्याने मध्यवस्तीत येत दोन मुलांसह पाच जणांवर हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
Four hours of leopard thriller in Shrirampur
Four hours of leopard thriller in Shrirampur

श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात रविवारी (ता. ५) बिबट्याने धुमाकूळ घातला. त्याने मध्यवस्तीत येत दोन मुलांसह पाच जणांवर हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. बिबट्याला पकडण्यासाठी मोजकेच लोक होते. मात्र, बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी, बिबट्या सैरभैर झाला. यातूनच त्याने एकापाठोपाठ एक, असा तब्बल सात जणांवर हल्ला केला.  श्रद्धा सचिन हिंगे (वय ११), ऋषभ अंबादास निकाळजे (वय ८), कांताशेठ कुमावत (वय ३५), बाळासाहेब अडांगळे (वय ५५), राहुल मारुती छल्लारे (वय ४२), मारुती शिंदे (वय ५०) यांच्यासह वन कर्मचारी लक्ष्मण किमकर (वय ५०) हे बिबट्याच्या हल्यात जखमी झाले. शहरातील कामगार रुग्णालयासह व बधे हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविले, अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.  शहरातील मोरगे वस्तीतील गुलाब झांजरी यांच्या घराच्या परिसरात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला. त्याने खासगी क्लासला जाणाऱ्या श्रद्धा हिंगे हिच्यावर अचानक हल्ला केला. त्यात तिच्या हातावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर बिबट्याने ऋषभवर झडप घातली. ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे बिबट्या आणखीच सैरभैर झाला. दुपारी एक वाजेपर्यंत हे थरारनाट्य सुरू होते. बिबट्याला पळवून लावण्यासाठी काही नागरीकांनी फटाके फोडले. आरडाओरडा केल्याने बिबट्या सैरभैर होऊन अधिक हिंस्र बनला.  दुपारच्या सुमारास झावरे मोटर्समागे झुडूपात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग, पालिका प्रशासन, महसूल विभाग व पोलिस पथकाने धाव घेतली. मोहटा देवी मंदीर परिसरात एका कॉलनीत वन विभागाने बिबट्याला पकडले. वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. काही वेळाने पिंजऱ्यात जेरबंद केले. 

उपचाराचा खर्च सरकार करणार  लोकवस्तीत घुसलेला बिबट्या घाबलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तो दिसेल त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवित होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरातील वैदू समाजातील काही लोकांची मदत घेण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्यांसह सहा नागरीक जखमी झाले. जखमींचा उपचारासाठी लागणारा खर्च सरकार करणार आहे. बेशुद्ध केलेल्या बिबट्यावर उपचार केल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com