Agriculture news in marathi Four lakh farmers in Wahda qualify for debt relief | Agrowon

वऱ्हाडातील चार लाख शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत वऱ्हाडातील चार लाख १२ हजारांवर शेतकरी पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. सोमवारी (ता. २४) या भागात काही गावांत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. अकोला जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द आणि देगाव या दोन गावांत पात्र ठरलेल्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत काहींना प्रमाणपत्र देण्यात आले.

अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत वऱ्हाडातील चार लाख १२ हजारांवर शेतकरी पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. सोमवारी (ता. २४) या भागात काही गावांत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. अकोला जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द आणि देगाव या दोन गावांत पात्र ठरलेल्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत काहींना प्रमाणपत्र देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सक्तीचे आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्यानंतर सहकार विभागामार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले होते. या योजनेअंतर्गत चुकीच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ होऊ नये यासाठी जिल्हा बँक आणि व्यापारी बँकांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जखाती आधार कार्डशी संलग्न करून खात्री केली जात आहे. सदर योजनेसाठी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतील चार लाख १२ हजार ५८० शेतकरी पात्र ठरलेले आहेत. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही. यात अकोला जिल्ह्यात १०१५, बुलडाणा ८११ व वाशीम जिल्ह्यातील ५७२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

जिल्हानिहाय पात्र शेतकरी 

जिल्हा  शेतकरीसंख्या
अकोला ११३६६८
बुलढाणा १९६१७४
वाशीम १०२७३८
एकूण   ४१२५८० 

 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...