जळगाव जिल्ह्यात चार लाख हेक्टर बाधित

जिल्ह्यात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे.
Four lakh hectares affected in Jalgaon district
Four lakh hectares affected in Jalgaon district

जळगाव : जिल्ह्यात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे. तब्बल तीन लाख ७१ हजार २५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. चार लाख ८५ हजार ८९ शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला पाठविला आहे. 

जिल्ह्यात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सर्वत्र अतिवृष्टी झाली. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. यातच प्रशासनातील कृषी विभाग म्हणतो पंचनामे पूर्ण केले, तर महसूल विभाग म्हणतो आम्हाला पंचनाम्याचे आदेश नाहीत. यामुळे संभ्रम, गोंधळ वाढत आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा आहे. 

गेल्या तीन आठवड्यांत जिल्ह्यातील काही भागांत तीनवेळा अतिवृष्टी झाली, तर गेल्या चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. उभ्या कापसाच्या शेतांमध्ये अक्षरश: पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण उद्‌ध्वस्त झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असून, कृषी विभागाने प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. 

अमळनेरला सर्वाधिक फटका  जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका अमळनेर तालुक्याला बसला असून, ५२ हजार ३२५ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. जळगाव तालुका २५ हजार ३२ हेक्टर, भुसावळ ४४, बोदवड ११ हजार ५०, यावल ९७५८, रावेर ८ हजार ९६७, मुक्ताईनगर १२ हजार ६०८, एरंडोल ३५ हजार ५९, धरणगाव १३ हजार ३००, पारोळा ४४ हजार ७२६, चोपडा ३१ हजार ५१७, चाळीसगाव ४८ हजार २१९, जामनेर ३१ हजार १२५, पाचोरा ३५ हजार ४४४, भडगाव १२ हजार असे एकूण ३ लाख ७१ हजार २५५ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.

४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन लाख ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात कापूस पिकाचे सर्वाधिक कोरडवाहू ४१ हजार ६२९, तर बागायती दोन लाख ५५ हजार २३ हेक्टर, मका ३३ हजार ४५२, ज्वारी ८ हजार १९१, सोयाबीन ८ हजार ३६२, उडीद- मूग ३७६२, बाजारी ६१७०, भाजीपाला ७८५०, ऊस ६६७, केळी ६८८, फळपिके २९०१, तूर २६४, भुईमूग ५११, तीळ २०४, सूर्यफूल २४.६, पपई ११९ हेक्टर, असे नुकसान झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com