पुणे जिल्ह्यात चार फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू होणार

जनावर आजारी पडल्यानंतर उपचारासाठी पशवैद्यकीय दवाखान्यापर्यंत घेऊन येणे शक्य होत नाही. काही वेळेस पशुपालकांना जनावरास स्वखर्चाने पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत घेऊन यावे लागत होते. हे सर्वांना परवडणारे नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या पशुपालकांना या योजनेचा चांगला फायदा होणार आहे. - डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
पुणे जिल्ह्यात चार फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू होणार
पुणे जिल्ह्यात चार फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू होणार

पुणे : मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत जनावरांवर गोठ्यात जाऊन उपचार व्हावेत, पैसा आणि वेळेची बचत व्हावी, या उद्देशाने फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पहिला फिरता पशुवैद्यकीय दवाखाना बारामती तालुक्यात सुरू करण्यात आला. आता जिल्ह्यातील जुन्नर, मुळशी, वेल्हा आणि भोर या चार तालुक्यांसाठी लवकरच पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले जाणार आहेत. बारामती तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्याकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार गाव, वाडी, वस्तीवर जाऊन सेवा देण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक आठवड्याचा अहवाल त्यांना कार्यालयाला पाठवावा लागणार आहे. ही सेवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रात्री देखील सेवा देणार आहे. या फिरत्या पथकात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, चालक पुरविले आहेत. फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची सेवा योग्य पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी ऑनलाइन सेवेचा वापर केला जाणार आहे. पशुचिकित्सा पथकांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्यांमधून नियुक्त करण्यात आले आहेत. दुर्गम, डोंगराळ शेतकऱ्यांची जनावरे आजारी पडल्यास वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, अशावेळी हा फिरता दवाखाना उपयोगी ठरणार आहे. फिरत्या दवाखान्यात या सेवा या योजने अंतर्गत वंध्यत्व, कृत्रिम रेतन, सुकलेला गर्भ, मंद प्रसूती, संसर्गजन्य विकार, अन्न विषबाधा, अतिसार, पोट फुगणे, सर्पदंश, दुखापत, गळू, जखम, अस्थिभंग, डोळ्यांचा कर्करोग आदी आजारांवर उपचार  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com