कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्प
राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
कृषिमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने या वेळी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित काटोल, नागपूर, अकोला अशा तीन ठिकाणी संत्रा गुणवत्ता सुधारणा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात नवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास परिषदेने मान्यता दिली. ‘हवामान अद्ययावत कृषी व जल व्यवस्थापन’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. राहुरी विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा विषय परिषदेने मान्य केला.
अकोला कृषी विद्यापीठात ‘सेंद्रिय शेतीमधील पीक संरक्षणाचे तंत्र’ हा आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील परिषदेने मान्यता दिली. यासाठी विद्यापीठाने हंगेरीतील डेब्रेसिन विद्यापीठाशी करार केला गेला आहे. मराठवाड्यातील हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या अवस्थांचा अभ्यास करून संशोधन होणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी स्वतंत्र केंद्र परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्थापन करण्यास परिषदेने मान्यता दिली.
बैठकीत कुलगुरू डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. एस. डी. सावंत (दापोली), डॉ. अशोक ढवण (परभणी) यांसह परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. विठ्ठल शिर्के, अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखेडे, तसेच इतर सदस्यांनी भाग घेतला.
- 1 of 696
- ››