शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
बातम्या
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार संघटनांचा पाठिंबा
पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन’ तसेच शेतकरी विचार मंच या चार संघटनांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन जानेवारीच्या अखेरीस नवी दिल्लीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील उपोषण आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन’ तसेच शेतकरी विचार मंच या चार संघटनांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन जानेवारीच्या अखेरीस नवी दिल्लीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील उपोषण आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, विलास वाघमारे, पांडुरंग सुतार उपस्थित होते. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्या व त्यांचा सर्वांगीण विकास होऊन सन्मानाने जगता यावे यासाठी अण्णांचे आंदोलन महत्त्वाचे असून वेळप्रसंगी जेलभरो आंदोलन करू, असे गवळी व सब्बन यांनी सांगितले. शरद जोशी पुरस्कृत शेतकरी विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनीही हजारे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
- 1 of 1536
- ››