पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदान

पुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान झाले. दुपारी चारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाल्याची माहिती विविध ठिकाणांच्या बातमीदारांनी कळविली.
 Up to four in Pune district 50% turnout
Up to four in Pune district 50% turnout

पुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान झाले. दुपारी चारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाल्याची माहिती विविध ठिकाणांच्या बातमीदारांनी कळविली. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

कुसेगाव (ता.दौंड) येथे मतदानासाठी मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजता एक उमेदवार मतदान केंद्राबाहेर मतदाराला चिन्ह सांगत असल्याच्या संशयावरून दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीचा प्रकार घडला.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली. मात्र, दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. जिल्ह्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, भोर ,वेल्हा, पुरंदर, इंदापूर, बारामती, दौड आदि तालुक्यांमध्ये निवडणुका होत आहेत.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरातील विविध गावच्या ग्रामपंचायतीसाठी उत्साहात मतदान झाले. तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी, खंडाळे, पिंपरी दुमाला, भांबर्डे आदी गावात मतदानासाठी नागरिकांनी उत्साह दाखविला. बहुतांश गावात दोन पॅनेलमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत.  आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील खडकवाडी, रानमळा, काठापूर बुद्रूक व शिरदाळे या ग्रामपंचायतींत मतदान झाले. 

मुळशीत अधिकाऱ्यांची भेट 

मुळशी तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील संवेदनशील मतदान केंद्रांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. शांततेत व तणावरहित मतदान प्रक्रिया पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. उरवडे, कासार अंबोली, भरे, चांदे, नांदे आदी केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून येत होता. निवडणुकीदरम्यान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी परिंचे येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदारांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, माजी सभापती अर्चना जाधव उपस्थित होत्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com