महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय मतदान टप्पे

महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय मतदान टप्पे
महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय मतदान टप्पे

नवी दिल्ली ः महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल १८ एप्रिल, २३ एप्रिल व २९ एप्रिल या चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागांत उन्हाळा तापण्याआधी म्हणजे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. पुणे, नगर, ओरंगाबाद व कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात, तर ठाणे जिल्हा व मुंबईतील सहा मतदारसंघांत सर्वांत शेवटच्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिलला मतदान घेतले जाईल. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होईल.  पहिला टप्प्यात ११ एप्रिलला ०७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात,  २३ एप्रिलला १४ मतदारसंघात तर २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होईल. लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार येणार असल्याचे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. सात टप्प्यात निवडणूक होणार असून, २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, निवडणुकीच्या धामधुमीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होत आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर २३ एप्रिलला मतदान होत आहे.

महाराष्ट्रातील निवडणुका पुढीलप्रमाणे : - पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात मतदान - दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला १० मतदारसंघात मतदान - तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला १४ मतदारसंघात मतदान - चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com