नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने होणार सुरु

जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर ऊस आहे. या जिल्ह्यात यंदाही चार साखर कारखाने सुरू होतील. गाळपाची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. यंदा दिवाळीदरम्यान ऊस गाळप सुरू होईल, असे संकेतआहेत.
 Four Sugar factories will be started in Nandurbar district
Four Sugar factories will be started in Nandurbar district

जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर ऊस आहे. या जिल्ह्यात यंदाही चार साखर कारखाने सुरू होतील. गाळपाची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. यंदा दिवाळीदरम्यान ऊस गाळप सुरू होईल, असे संकेत आहेत. 

ऊस तोडणीसाठीदेखील निरभ्र, कोरडे वातावरण आवश्यक असते. यंदा ऑक्टोबरमध्येदेखील पावसाचे संकेत आहेत. यामुळे ऑक्टोबरमध्ये खानदेशात साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता कमी आहे. परंतु गाळपाची तयारी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होईल, असे दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दोन सहकारी व दोन खासगी कारखाने सुरू होतील. त्यात पुरूषोत्तमनगर (ता.शहादा) येथे सातपुडा सहकारी साखर कारखाना, डोकारे (ता.नवापूर) येथे आदिवासी सहकारी साखर कारखाना, समशेरपूर (ता.नंदुरबार) येथे आयान शुगर आणि तळोदा येथे एक खासगी कारखाना सुरू होईल. गेल्या वर्षी सातपुडा कारखान्याने सुरवातीपासून गाळपात आघाडी घेतली होती. 

चोपड्यात शेतकऱ्यांचा पाठपुरावा

जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता.चोपडा) येथील कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्याचे संचालक, शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच न्हावी (ता.यावल)येथील मधुकर सहकारी कारखाना सुरू करण्यासाठीदेखील शेतकरी, संचालक आग्रही आहेत.  मुक्ताईनगर येथील मुक्ताई खासगी कारखानादेखील यंदा सुरू होईल. भोरस (ता.चाळीसगाव) येथील खासगी कारखाना यंदा सुरू होईल की नाही, याबाबत कुठलाही स्पष्टता अद्याप नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com