यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या जिल्ह्यात आता ''बर्ड फ्लू''च्या संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आर्णी तालुक्‍यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चार हजार कोंबड्यांचा मृत्यू Four thousand hens died
चार हजार कोंबड्यांचा मृत्यू Four thousand hens died

यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या जिल्ह्यात आता ''बर्ड फ्लू''च्या संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आर्णी तालुक्‍यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यानंतर गेल्या दोन दिवसांत यवतमाळ शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमध्ये सुमारे चार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी सुरक्षितता म्हणून दहा किलोमीटरचा परिसर सतर्कता झोन म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत मरण पावलेल्या पक्ष्यांचा एच १, एन १ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील पशुसंवर्धन यंत्रणाही सज्ज झाली आहे. कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता ''बर्ड फ्लू''चा धोका निर्माण झालेला आहे. मागील काही दिवसांपासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यातही वाढता आहे. 

पांढरकवडा तालुक्‍यातील लिंगटी (सायखेडा) येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. आर्णी तालुक्‍यात आठ मोर दगावले आहेत. आर्णी येथील मोरांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणी ऍलर्ट झोन घोषित करून उपाययोजना राबविले जात आहेत. कोंबडी, मोर या नंतर कावळा अशा पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याने त्यांचे नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आलेले आहेत.

या ठिकाणाहून आतापर्यंत मोरांचे अहवाल आले आहेत. अजूनही अनेक नमुने प्रलंबित आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमधील पक्षाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी (ता.१८) जवळपास १ हजार ७०० पक्षी, तर मंगळवारी (ता.१९) दोन हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत ३ हजार ७०० हजार पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बलदेव रामटेके यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. तपासणी करून काही नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात येणार 

असल्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सांगितले. लिंगटी येथील नमुने निगेटिव्ह पांढरकवडा तालुक्‍यातील लिंगटी येथे पोल्ट्रीमधील बर्डचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणाचे नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आलेले होते. पशुसंवर्धन विभागाला या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यानुसार या ठिकाणाचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

प्रतिक्रिया यवतमाळ शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा येथे दोन दिवसांपासून पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांत जवळपास तीन हजार सातशे पक्षी मृत झालेत. संबंधित परिसरात ऍलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना राबविल्या जात आहेत. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या भागात लक्ष ठेवून आहेत. -डॉ. बलदेव रामटेके, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com