राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढली

राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढली
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढली

मुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरू असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्रे असतील. मतदारांची नोंदणी सुरू असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. 'संवेदनशीलता'केंद्रांना सुरक्षा पुरविण्यात येते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान ८ प्रकारच्या मूलभूत सुविधा बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युतपुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअरवरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com